I Understand...
मी पहिल्यांदा पासपोर्ट काढायला गेले तेव्हाची गोष्ट...त्यावेळी भरलेले फाॅर्म तपासून देण्यासाठी एक कांऊटर असायचा. तिथे पोहचले. कांऊटर पलिकडच्या त्या ऑफीसरला, त्याने फाॅर्म मधल्या चुका दाखवल्यावर उर्मटपणे बोलणा-या माणसांनी थकवा आणला होता. माझा नंबर आला. माझ्या ही फाॅर्ममध्ये मी चूक केलीच होती. आतापर्यंत त्याच्यावर फेकलेले अस्त्र आता त्याने माझ्यावर प्रक्षेपित केले. माझ्या master's ची मार्कलिस्ट पहात म्हणाला "तुमच्यासारखी double graduate माणसे अशा चुका करतात, काय करायच?" "I understand Sir, पण काय करायंच, आम्ही आज इथे सुशिक्षित अडाणी आहोत. पहिलाच पासपोर्ट आहे सर...पुढच्या वेळेस नीट भरेन" इति हसून मी. आता कपाळाची आठी विस्कटली आणि आम्ही दोघे हसलो. त्याचा ताण किमान माझा फाॅर्म भरेपर्यन्त तरी निवळला.
एअरपोर्टवरती येणारा नेहमीचा अनुभव, पहाटेची किंवा मध्यरात्रीची फ्लाईट असेल तर कांऊटरवर असलेला स्टाफ रात्रभर जागा असतो. शेकडो प्रवासी, असंख्य बॅग्स आणि अशक्य perfection मागणारे नियोजन ह्यासोबत खोटं खोटं हसण्याचे compulsion.
मी कांऊटरवर पोहचल्या पोहचल्या wish करते आणि नक्की म्हणते, Hey, doing great job! It's difficult working in odd hours.
ह्याचा अर्थ असतो "I understand"
समोरची व्यक्ती मनापासून कृतज्ञतेने हसते. (अपवाद असतात ह्यांना ही) पण बहुतेकदा apply होतेच.बॅंकेत जाऊन रांगेत उभी राहते पलिकडे कॅशिअर म्हणून बसलेल्या बाईच्या चेह-यावर अखंड ताण असतो. रांगेत उभे असलेले लोकही हतबल आणि वैतागलेले असतात. मी माझा नंबर आला की ती वर पाहते मग मी अभिवादन म्हणून मोकळी हसते. स्लिप किंवा टोकन देताघेता मी म्हणते, आज गर्दी जास्त दिसतेय..." मग ती ही हाताने शिक्के मारत मारत म्हणते,"हो रोजचेच आहे हो. ताणाचे काम आहे." मी म्हणते,"I undestand" मी तिला समजून घेतलंय ह्या नुसत्या भावनेने तिची आठी कमी होते आणि माझे काम ही हसतखेळत होऊन जाते.
संध्याकाळी घरी आल्यावर जोडीदाराला किंवा मुलांना नुसतं "खरंच खूप ताण आहे तुला, कळतयं मला" असं नुसतं म्हणल्याने सुद्धा ताण उतरतो. कारण message असतो,"I understand."
बाहेरून कामे आटपून घरात पोहचते. लेकीने आजीचा घाम काढलेला असतो. मग मी आजीला म्हणते,"थकवलं ना बयेने?" त्या म्हणतात," छे गं, तिचा काही त्रास नाही." पण मी म्हणते,"माहित आहे तुमची गुणी नात means I UNDERSTAND"
परवाच सा-या मैत्रिणी भेटलो, खरं तर माझ्या पायाला तीन महिन्यापूर्वी गंभीर दुखापत झालीय. जिना चढता येत नाहीये. सगळ्यांनी मिळून मोफत सल्ला केंन्द्र सुरु केले. शेजारी बसलेली सखी म्हणाली,"कसं काय करतेस गं सगळं manage? It's difficult" मी म्हणाले,"सांगते कुणाला?" तर म्हणाली,"I understand. मग मी ही मनमोकळी हसले.
हे "I Understand" म्हणजे जादुई छडी आहे. ज्याला आपण empathy म्हणतो. असह्य ताणात जगणा-या माणसांच्या गर्दीत कुणीच आपल्याला समजून घेत नाही ह्या भावनेने नवा ताण निर्माण होतो. पैसे फेकून आपण service विकत घेतो, माणसे नाही. त्या कांऊटरच्या पलिकडे, त्या हुद्द्याच्या मागे मग तो रिक्षावाला असो की पायलट, स्वतःचे मानवी अस्तित्व गमावून मशिनसारखे काम करत असतो त्यात एखादा संवाद घडवून त्याला किंवा तिला नक्की सांगा...I Understand!
source : whats app