|| Shri Bhavani Mandir || Aasle, Tal. Wai Dist. Satara

।। श्री भवानी मंदिर।। 

आसले ता. वाई जि. सातारा









Yamunabai Waikar


साताराची सुवर्णरत्ने - लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर

कृष्णाकाठच्या या कलासाधिकेने सारं आयुष्य कलेसाठीच अर्पण केलं. 

३१ डिसेंबर १९१५ रोजी यमुनाबाई वाईकर यांचा जन्म वाई जि. सातारा येथील कोल्हाटी समाजात झाला.

आयुष्याच्या मार्गातील अनेक खडतर प्रसंगाना सामोरे जात त्यांनी स्वतःच्या कलेने, लावणीस सम्राज्ञीपदावर पोहचवले. कलेबरोबरच गावाला, समाजाला आणि याच वाटेने चालणार्‍या असंख्य कलाकारांना आनंदाचे वाटेकरी केले.यमुनाबाईंनी कोल्हाटी-डोंबारी समाजास केंद्रशासनाच्या दप्तरी अत्यंत गौरवाचे स्थान मिळवून दिले.

महाराची पोरनाटक बघावयास साने गुरुजी आले होते. या प्रयोगाचे सर्व उत्पन्न यमुनाबाईंनी गुरुजींच्या समाजकार्याला दिले.

त्यांच्या या तमाशाफडात दडलेले नाट्य आणि संगीत गावोगावच्या रसिकांना अनुभवायला मिळाले आहे

Kakal Kalelkar - Prominent Personality of Satara


भारताचे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ, पत्रकार, स्वातंत्र्य सेनानी दत्तात्रेय बालकृष्ण कालेलकर उर्फ काका कालेलकर यांचा जन्म 
1 डिसेंबर 1885 मध्ये सातारा येथे झाला. 

काका कालेलकर यांनी पुणे येथील फरग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले.

1915 मध्ये शांति निकेतन मध्ये त्यांची महात्मा गांधी यांच्याबरोबर भेट झाली आणि त्यांनी आपले आयुष्य महात्मा गांधीच्या कार्यास समर्पित केले. 

महात्मा गांधी यांचे जवळचे सहकारी असल्यांने त्यांची काका या टोपणनावाने ते प्रसिद्ध झाले. 

ते साबरमती आश्रमचे प्राचार्य होते. 

अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठ उभारणीमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. 1928 ते 1935 पर्यंत गुजरात विद्यापिठाचे कुलगुरु म्हणून त्यांनी काम पाहिले. 

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली जेवढा आंदोलने झाली त्या सर्व आंदोलनामध्ये काका कालेलकर यांनी भाग घेतला होता. 5 वर्षे त्यांनी तुरुंगवास भोगला होता. 1930 मध्ये येरवडा जेलमध्ये त्यांनी महात्मा गांधी यांच्याबरोबर महत्वपूर्ण काळ घालवला. 

मातृभाषा मराठी असली तरी गुजरातीचे ते प्रसिद्ध लेखक म्हणून गणले गेले. त्यांनी गुजराती, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत विविध विषयांवरील 30 पेक्षा जास्त पुस्तके रचली. रवीन्द्रनाथ ठाकुर यांच्या साहित्याचा मराठी आणि गुजराती भाषेत अनुवाद केला.

काका कालेलकर हे 1952 ते 1964 पर्यंत संसदचे सदस्य होते. 1964मध्ये त्यांना पद्मविभूषण ने सन्मानित करण्यात आले. ते मासाग वर्ग आयोग, बेसिक एजुकेशन बोर्ड’, ‘हिन्दुस्तानी प्रचार सभा’, ‘गांधी विचार परिषद यांचे अध्यक्ष तर गांधी स्मारक संग्रहालय चे निर्देशक राहिले होते.


हिंदी राष्ट्रभाषा व्हावी यासाठी त्यांनी दिलेले याेगदान महत्वपूर्ण आहे. ते म्हणत "राष्ट्रभाषा प्रचार हमारा राष्ट्रीय कार्यक्रम है।" 


काका कालेलकर यांनी अनेक देशातील यात्रांमध्ये गांधीवादी विचारांचा प्रसार केला आहे. 

काका कालेलकर यांचे 21 ऑगस्ट 1981 मध्ये निधन झाले.

Gagangiri Maharaj


||ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ||

श्रीपाद गणपतराव पाटणकर उर्फ गगनगिरी महाराज यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील मणदुरे तालुका पाटण येथे १९०६ मध्ये झाला.

गगनगिरी महाराजांना विश्वगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

संपूर्ण देशभरात, तसेच जगातही ठिकठिकाणी त्यांचे शिष्य व अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत.
नाथ संप्रदायातील महंताबरोबर ते संपूण भारतभर फिरले, नेपाळ, भूतान,मानससरोवर, गौरीशंकर, गोरखदरबार, गोरखपूर, पशुपतीनाथ येथून ते अल्मोडा येथे गेले. गंगा नदीच्या खोरे, हिमाचल प्रदेश येथूनही त्यानी आध्यात्मिक ज्ञान संपादण्यासाठी प्रवास केला.

महायोगी गगनगिरी महाराजांची इतर वैशिष्ट्ये सध्याच्या कलीयुगामध्येही योगशास्त्रातील अनेकविध अवघड सिद्धी व चमत्कार प्रत्यक्ष आत्मसात केलेले असे ते महायोगी होते.

निर्मनुष्य व अनेक हिंस्त्र श्वापदे असणाऱ्या गगनगडावरील ५२ तळी व सांगलीतील वाटार येथील ५ ते ६ डोहांत त्यांनी दीर्घकाळ जलतपश्चर्या केली