भारताचे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ, पत्रकार, स्वातंत्र्य
सेनानी दत्तात्रेय बालकृष्ण कालेलकर उर्फ काका कालेलकर यांचा जन्म
1 डिसेंबर 1885 मध्ये
सातारा येथे झाला.
काका कालेलकर यांनी पुणे
येथील फरग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले.
1915 मध्ये शांति निकेतन
मध्ये त्यांची महात्मा गांधी यांच्याबरोबर भेट झाली आणि त्यांनी आपले आयुष्य महात्मा गांधीच्या कार्यास समर्पित केले.
महात्मा गांधी यांचे जवळचे सहकारी असल्यांने त्यांची काका या टोपणनावाने ते प्रसिद्ध झाले.
ते साबरमती आश्रमचे प्राचार्य होते.
अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठ उभारणीमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. 1928 ते 1935
पर्यंत गुजरात विद्यापिठाचे कुलगुरु म्हणून त्यांनी काम पाहिले.
महात्मा गांधीच्या
नेतृत्वाखाली जेवढा आंदोलने झाली त्या सर्व आंदोलनामध्ये काका कालेलकर यांनी भाग
घेतला होता. 5 वर्षे त्यांनी तुरुंगवास भोगला होता. 1930 मध्ये येरवडा जेलमध्ये त्यांनी महात्मा गांधी यांच्याबरोबर महत्वपूर्ण काळ घालवला.
मातृभाषा मराठी असली तरी
गुजरातीचे ते प्रसिद्ध लेखक म्हणून गणले गेले. त्यांनी गुजराती, मराठी, हिंदी आणि
इंग्रजी भाषेत विविध विषयांवरील 30 पेक्षा जास्त पुस्तके रचली. रवीन्द्रनाथ ठाकुर यांच्या
साहित्याचा मराठी आणि गुजराती भाषेत अनुवाद केला.
काका कालेलकर हे 1952 ते 1964
पर्यंत संसदचे सदस्य होते. 1964मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’ ने सन्मानित करण्यात आले. ते मासाग वर्ग आयोग, ‘बेसिक एजुकेशन बोर्ड’, ‘हिन्दुस्तानी प्रचार सभा’, ‘गांधी विचार परिषद’ यांचे अध्यक्ष तर ‘गांधी स्मारक संग्रहालय’ चे
निर्देशक राहिले होते.
हिंदी राष्ट्रभाषा व्हावी यासाठी त्यांनी दिलेले याेगदान महत्वपूर्ण आहे. ते म्हणत "राष्ट्रभाषा प्रचार हमारा राष्ट्रीय कार्यक्रम है।"
काका कालेलकर यांनी अनेक देशातील यात्रांमध्ये गांधीवादी विचारांचा प्रसार केला आहे.
काका कालेलकर यांचे 21 ऑगस्ट 1981 मध्ये निधन झाले.
Hey there,
ReplyDeleteNice blog
check out our blogs
YouTube promotion Packages India