Shri Gopalnath Maharaj Mandir Triputi, Satara, Maharashtra

श्री परब्रम्ह गोपालनाथ महाराज समाधी मंदिर त्रिपुटी, सातारा


सातारा-कोरेगाव रस्त्यावर साताऱ्यापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर त्रिपुटी येथे गोपालनाथ महाराज यांचे समाधिस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 


गोपाळनाथ महाराजांचा जन्म सलाबतपूर या गावी झाला. हे गांव नगर जिल्ह्यात नेवासे तालुक्यात येते.
पयोष्णि नदीच्या तीरावर असलेल्या "रामतीर्थ" या स्थानी तपस्येस गेले. कठीण तपस्या केली. तप फळाला आले. आकाशातून जलप्रसाद पडला. पाठोपाठ श्री दत्तात्रेय प्रगटले. त्यांनी लक्ष्मणाला क्षेमालींगन दिले. श्री दत्तात्रेयानी मनोरथ विचारले. "ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी, अन्य काही मागणे नाही" असे लक्ष्मणाने सांगितले. श्री दत्तात्रेयांनी ही इच्छा पूर्ण केली. लक्ष्मण गुडघ्यावर नतमस्तक बसले, बद्धांजुळी पसरुन एकाग्रतेने श्रवण करु लागले. दत्तात्रेयांनी त्यांच्या मस्तकी वरदहस्त ठेविला व वेदशास्त्राचेबीज असे ब्रह्मज्ञान सांगितले. श्री दत्तात्रेयांनी विचारले "पूर्ण समाधान झाले काय?", उत्तर आले "होय हे दयार्णवा, मी संशयरहित झालो". या क्षणीच "लक्ष्मण" हे "गोपाळनाथ" झाले.
पण थोड्याच वेळात श्री दत्तात्रेय अंतर्धान पावले आणि आकाशवाणी झाली - "हे नाथा, तुला सद् गुरु कृपा होताच तुझे ज्ञान सफल होईल. घार मस्तकावर घिरट्या घालीत आहे, त्याच वेळी जो पुरुष तुझ्या पाठीशी उभा राहून तुला दुग्धवाटी पाजेल असा पुरुष हाच तुझा गुरु समज व त्याला शरण जा."
गुरूच्या शोधात गोपाळनाथ भ्रमंती करीत असताना खानदेशात सिऊरबारापाड्याचे या गावी अगदी वर सांगितल्या सारखा प्रसंग घडला व नाथांना त्यांचे गुरू रंगनाथ हे भेटले. हे रंगनाथ सोनार समाजातील सत्पुरूष होते.
श्रीनाथांची गुरूपरंपरा ही आदिनारायनापासून आली. हि नाथ परम्परा आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जी दत्त-जनार्दन-एकनाथ ही परंपरा माहिती आहे, त्याच परंपरेत श्री गोपाळनाथ येतात. श्री गोपाळनाथ हे वरील परंपरेतील रंगनाथांचे शिष्य. गोपाळनाथांचा काळ इ. स. १६९० ते इ. स. १७६६ (शके १६१२ ते १६८८) हा होय. ही परंपरा गोपाळनाथांच्या नंतरही आज अखेर विद्यमान आहे.
रंगनाथांकडे गोपाळनाथांनी ब्रह्मविद्येचे ज्ञान प्राप्त केले. खुद्द दत्तात्रेयांनी वरदहस्त ठेवल्यावरही गोपाळनाथांना गुरूची आवश्यकता होती. रंगनाथांनी गोपाळनाथांना योगविद्देत परीपुर्ण पारंगत केले. रंगनाथांकडे गोपाळनाथांच्यावर जे संस्कार झाले, त्यामुळे गोपाळनाथ सर्वदृष्टीने ब्रह्मविद्या व योगशास्त्र जाणते झाले. गुरूंचे हे ऋण त्यांनी अखंड मिरविले. संप्रदायात जे भजन म्हटले जाते त्यात गुरूशिष्यांच्या या प्रेमाचे चित्र उमटले आहे. "रंगनाथ गोपाळ । जय जय रंगनाथ गोपाळ"
गोपालनाथ महाराज हे एकनाथांच्या परंपरेतील ब्रह्मचारी नाथयोगी. त्यांचा जन्म इ. स. १६९० मध्ये झाला आणि वयाच्या ७६ व्या वर्षी इ. स. १७६६ मध्ये ते समाधिस्थ झाले.

समाधी मंदिराच्या मागे एक बांधीव तलाव आहे. बाजूला गोपालनाथ महाराजांचा मठ आहे. मठाच्या बाजूला एक विहीर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात समाधीच्या दुसऱ्या पायरीवरून सतत पाणी वाहत असते. शांत परिसर व भक्तिमय वातावरणामुळे त्रिपुटी हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. 


Satara + Bal Kolhatkar






साताराची सुवर्णरत्ने - बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हटकर




महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू. 

बाळ कोल्हटकरांचा जन्म २५ सप्टेंबर रोजी सातारा येथे झाला.

शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले. लहानपणापासून नाटकांची अतिशय आवड. तसेच लेखनाचीही आवड होती.

त्यामुळे लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी "जोहार" हे आपले पहिले नाटक लिहिले.

ज्यांना पुर्वी लोक हसायचे आणि टिंगल करायचे असे बाळ कोल्हटकर प्रेकक्षांची नस नेमकी ओळखत असत.

त्यांच्या नाटकातील प्रसंग भले बेतलेले असोत थोडेसे अती भावनिक असोत पण सामान्य प्रेक्षकांना अश्रु पुसायला लावत.

त्यांची बरीच नाटकं अतिशय लोकप्रिय झाली. बर्‍याच नाटकांचे हजाराच्या वर प्रयोग झाले. व्यवसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती तरी प्रत्येक नाटकातून काही मूल्य जपली होती.

"दुरितांचे तिमिर जावो" या नाटकांचे पंधराशे प्रयोग, 'वाहतो ही दुर्वाची जुडी' या नाटकाचे चौदाशे प्रयोग, मुंबईची माणसे' याचे जवळपास दोन हजाराच्या वर तर 'एखाद्यांचे नशीब' या नाटकांचे हजारावर प्रयोग झाले. यावरुन नाटककार म्हणून लोकांनी त्यांच्यावर किती प्रेम केले याची साक्षच पटते.

त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे मोठेपण आहे. अशा या ज्येष्ठ नाटककाराचे ३० जून १९९४ रोजी निधन झाले.

Satara - Chief Justice P B Gajendrgadkar



साताराची सुवर्णरत्ने- भारताचे माजी मुख्य न्यायाधीश पी. बी. गजेंद्रगडकर


भारताचे माजी मुख्य न्यायाधीश पी. बी. गजेंद्रगडकर यांचा जन्म सातारा येथे 16 मार्च, 1901 रोजी झाला. 1945 मध्ये बॉम्बे हायकोर्टचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. जानेवारी 1956 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठावर पाठवण्यात आले. पुढे 1964 मध्ये ते भारताचे मुख्य न्यायाधीश झाले. कायदेशीर व औद्योगिक कायदा यांच्या विकासात त्यांचे योगदान महान आणि अद्वितीय म्हणून घेतले जाते. भारत सरकारच्या विनंतीवरुन त्यांनी केंद्रीय कायदा आयोग , कामगार राष्ट्रीय आयोग आणि बँक पुरस्कार आयोग अशा अनेक कमिशनचे काम पाहिले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून त्यांनी दक्षिण भारतातील गांधीग्राम आयोजित ग्रामीण संस्था येथे कार्य केले.

Karmaveer Bhaurao Patil



दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली.

Satara and Dr. Babasaheb Ambedkar


साताराची सुवर्णरत्ने - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली महू मध्यप्रदेश येथे झाला असला तरी साताराच्या मातीचे पुण्य की काय म्हणून या महामानवाचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे पूर्ण होण्याचा इतिहास घडला.

इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली. ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात (सदर बझार येथे) आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. भीमरावाचे नाव दाखल केले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला.

इ.स. 1853 साली सुरु झालेल्या प्रतापसिंह हायस्कूल मध्ये आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राथमिक शिक्षणाचे दाखले पाहावयास मिळतात.