साताराची सुवर्णरत्ने - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली महू मध्यप्रदेश येथे झाला असला तरी साताराच्या मातीचे पुण्य की काय म्हणून या महामानवाचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे पूर्ण होण्याचा इतिहास घडला.
इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली. ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात (सदर बझार येथे) आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. भीमरावाचे नाव दाखल केले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला.
इ.स. 1853 साली सुरु झालेल्या प्रतापसिंह हायस्कूल मध्ये आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राथमिक शिक्षणाचे दाखले पाहावयास मिळतात.
No comments:
Post a Comment