Samarth Shriti Theme Park

Samarth Shriti Theme Park

Sajjangad Road, Gajawadi, Satara Maharashtra


वाचन कालावधी 10 दहा मिनीट                          शब्दलेखन Satara Plus : 8308456916

समर्थ सृष्टी थीम पार्क
सज्जनगड रोड, गजवडी, सातारा, महाराष्ट्र



सज्जनगडाच्या पायथ्याशी शांत रमणीय नैसर्गिक परिसरात आलेले समर्थ सृष्टी थीम पार्क समर्थ रामदास स्वामी यांचे जीवनातील ठळक घडामोडी उलगडून सांगते.

प्रथम समर्थ रामदास स्वामी यांचे हस्तलिखित काही पत्रे पाहावयास मिळतात त्यानंतरच्या दालनात त्यांचे जीवनातील ठळक घडमोडी उत्तमरित्या देखाव्यांनी उलगडल्या गेल्या आहेत. देखाव्यांसोबत वाचन, संगीत यांची संगत देखावे पाहताना त्या काळात आपल्याला कधी घेऊन जातात समजतच नाही. त्या वेळचा काळ सहज आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. एकदा नाही तर दोनदा हा देखावा पाहून नीट समजून उमगून घ्यावा असे वाटणे स्वाभाविकच...

या नंतरचे दालनात समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या 11 अकरा मारुतींचे प्रतिकृतींचे दर्शन घडते. येथेही देखावे, माहिती, संगीत यांचे साथीने आपण भारावून जातो. शेजारीच छोटेखानी ग्रंथालयही उपलब्ध आहे.

अकरा मारुतीं दर्शन नंतर आपल्याला समर्थ रामदास स्वामी यांचे जीवनावरील चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी मिळते. हा चित्रपट अतिशय उत्तमरित्या चित्रीत करण्यात आलेला असून तो त्यांची लांबी अजून वाढती असावी असे नक्कीच वाटते. छोटयांसाठी बागेतील खेळणीही आकर्षित ठरतात तेथून त्यांचा पाय सहज निघत नाही.

समर्थ रामदास स्वामी यांचा जीवनपटच्या या थीम पार्कमुळे पर्यटक भक्तांना एक अनोखी पर्वणीच या ठिकाणी उपलब्ध झाल्याचे दिसून येते.

External Links






Dattatreya Temple Shahupuri Satara

श्री दत्त देवस्थान शाहुपूरी गेंडामाळ सातारा
वाचन कालावधी 2 दोन मिनीट                          शब्दलेखन Satara Plus : 8308456916

||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त||

सातारा शहराजवळील शाहूपुरी येथील
"श्री दत्त देवस्थान" हे श्री दत्त भक्तांना आकर्षित करणारे आहे. 
श्री दत्तात्रेयांची मुर्ती मन प्रसन्न करणारी आहे.  श्री दत्तात्रयांचे नाम घेत मन: शांती या शांततामय परिसरात हमखास लाभते.

मंदीराचा परिसर हिरवागार, अल्हाददायक दिसून येतो. शेजारीच सुरेख बागही बालकांसाठी सुशोभीत आहे. 

परिसरातील शाळा, अंगणवाड्या याठिकाणी आवर्जून शाळेची सहल आयोजित करतात. श्री दत्त कार्यक्रम मोठ्या उत्साहाने येथे आयोजित केले जातात. 


महत्वाच्या लिंक्स