Samarth Shriti Theme Park

Samarth Shriti Theme Park

Sajjangad Road, Gajawadi, Satara Maharashtra


वाचन कालावधी 10 दहा मिनीट                          शब्दलेखन Satara Plus : 8308456916

समर्थ सृष्टी थीम पार्क
सज्जनगड रोड, गजवडी, सातारा, महाराष्ट्र



सज्जनगडाच्या पायथ्याशी शांत रमणीय नैसर्गिक परिसरात आलेले समर्थ सृष्टी थीम पार्क समर्थ रामदास स्वामी यांचे जीवनातील ठळक घडामोडी उलगडून सांगते.

प्रथम समर्थ रामदास स्वामी यांचे हस्तलिखित काही पत्रे पाहावयास मिळतात त्यानंतरच्या दालनात त्यांचे जीवनातील ठळक घडमोडी उत्तमरित्या देखाव्यांनी उलगडल्या गेल्या आहेत. देखाव्यांसोबत वाचन, संगीत यांची संगत देखावे पाहताना त्या काळात आपल्याला कधी घेऊन जातात समजतच नाही. त्या वेळचा काळ सहज आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. एकदा नाही तर दोनदा हा देखावा पाहून नीट समजून उमगून घ्यावा असे वाटणे स्वाभाविकच...

या नंतरचे दालनात समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या 11 अकरा मारुतींचे प्रतिकृतींचे दर्शन घडते. येथेही देखावे, माहिती, संगीत यांचे साथीने आपण भारावून जातो. शेजारीच छोटेखानी ग्रंथालयही उपलब्ध आहे.

अकरा मारुतीं दर्शन नंतर आपल्याला समर्थ रामदास स्वामी यांचे जीवनावरील चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी मिळते. हा चित्रपट अतिशय उत्तमरित्या चित्रीत करण्यात आलेला असून तो त्यांची लांबी अजून वाढती असावी असे नक्कीच वाटते. छोटयांसाठी बागेतील खेळणीही आकर्षित ठरतात तेथून त्यांचा पाय सहज निघत नाही.

समर्थ रामदास स्वामी यांचा जीवनपटच्या या थीम पार्कमुळे पर्यटक भक्तांना एक अनोखी पर्वणीच या ठिकाणी उपलब्ध झाल्याचे दिसून येते.

External Links






2 comments:

  1. really informative content


    please visit here once

    we are the best Digital marketing company in Delhi.

    ReplyDelete
  2. Very nice informative Email marketing remains one of the most affordable and high-performing digital channels Email Sender Software

    ReplyDelete