मी राजवाडा सातारा चौपाटी
जवळ जवळ 60 दिवस होत आले मी बंद आहे. पूर्ण शांत... एकटी... गोंगाट नाही, बच्चे कंपनीचा फुग्यांसाठी हट्ट नाही की खेळण्यासाठी मागणी नाही. सुपनेकरांचा दही भर... पैसे सुट्टेच द्या... हात वर करा... असा प्रेमळ ओरडा नाही, चायनीज च्या मालकांचा या या हा आवजही नाही की आईस्क्रिमसाठी भैय्यांची हाकही ऐकू नाहीये. पाणीपुरी साठी ती लगबगही नाही. सातारची प्रसिद्ध कुल्फी ही कोणी मागत नाही.... रात्र तर मला खायाला उठते... तुम्हीच मला गर्दीची सवय लावली आहे. आता हे एकाकी दिवस मला सहन होण्याच्या पलिकडे गेले आहेत.
आठवतय तुम्हाला.... !!!
चौपाटीची सकाळ मस्त आणी स्वस्त अशा पुरीभाजीने होते जी अनेक गोरगरीब सातारकर खावून आपली न्याहरी करत असतात. दहा अकरा झाले की सातारकरांची वडापाव वर झुंबड उडते. त्यातल्या त्यात बंडू वडापाव तर विचारुच नका वेळेची पर्वा न करता गरमागरम वडापाव बटाटा भजी खावून घेऊनच धन्य मानले जाणारे सातारकर...
काही परप्रातीयांच्या आईस्क्रिमच्या गाड्या जेथे अगदी पाच 5 रुपयांपासून आजही आईस्किम मिळते, तो मिल्कशेक, फालूदा हेही परवडणा-या किंमतीतच. तसचं पाणीपुरी, भेलपुरीही...
अजिंक्य भेळ तर चौपाटीची प्रसिद्ध भेळ तीचे प्रकारही अनेक. चौपाटीवर मिळणारे गरमागरम मसाला दूधही प्रसिद्धच. सुपनेकरांचे विविध पदार्थांसाठी तर रांगा लागलेल्या (वडा चटणी, पॅटीस, शाबूवडा, दहीवडा, मिसळ)
सायंकाळी तर चौपाटीला रोज यात्रेचे स्वरुप
चायनीज काय कच्छी दाबेली, अनेकाविध खाद्यपदार्थांची मांदयाळीच
त्याच बरोबर छोट्या बच्चे कंपनीसाठी खेळणीही
चौपाटी रोज कितीतरी सातारकरांचे जिभेचे चोचले पूर्ण करते... तसचं अनेकांचा रोजचा व्यवसायही...
अनेक कुटूंब ही चौपाटीवर काम करुन उदरनिर्वाह करत असतात.
हे सर्व कोरोनाच्या जागतिक संकंटामुळे एकाकी बंद झाले जवळ जवळ साठ 60 झाले असतील अजून किती दिवस चौपाटी बंद राहिल हे ही माहिती नाही.
चौपाटीच्या रोजच्या उत्पन्नातून उदरनिर्वाह करणारे सध्या कुठे असतील कसे असतील काय करत असतील याची काळजी आहेच...
हे ही दिवस जातील नक्कीच... पुन्हा चौपाटी सातारकांनी भरुन जाईंल पण होणारे नुकसान भरुन निघणार नाही.
आईस्क्रिमचे गाडे, पाणी पूरी चे ठेले, कच्छी दाबली यांचे ठेले चालविणारे कदाचित परप्रातिंय सातारा मधून गेलेही असतील... ते परत नाही आले तर सातारकांनी त्यांची उणिव भासू देवू नये.
या काळात सर्वांनी काळजी घ्या लवकर विजयी व्हा ... !!!
कोरोना हरेलच...
मी तुमची वाट पाहत आहे...
राजवाडा चौपाटी सातारा...