सातारा म्हणजे कृष्णेच्या पवित्र काठावर वसलेले एक शांतताप्रिय शहर, ज्याची पहाट पक्षांच्या किलबिलाटाने होते.
प्रदूषणमुक्त वातावरण व आरोग्यपूर्ण हवा हीच साता-याची ओळख.
या भुमीला सांस्कृतीक वारसा लाभलेला आहे.
जिल्ह्यातील कित्येक थोर योध्दे,राजे,संत आणि थोर व्यक्तिमत्वांनी महाराष्ट्राचा इतिहास घडवला आहे.
अशी व्यक्तिमत्वे सातारची सुवर्णरत्नेच आहेत.
त्यातील काही व्यक्तिमत्वांची थोडी माहीती देण्याचा प्रयत्न केला आहे.
=======================================================================
समर्थ रामदास
समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यात्मिक गुरु आणि मार्गदर्शक होते. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी सलग १२ वर्षे अध्यात्माचा अभ्यास केला. त्यानंतर ते १२ वर्षे संपूर्ण देशभर फिरले (तिर्थाटन) उंब्रज जवळील 'चाफळ' येथे त्यांनी अध्यात्माची शिकवण देण्यास सुरुवात केली. समाजाला दैववादातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी सर्वांना प्रयत्नवादाची शिकवण दिली. ते म्हणाले, " केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ॥ यत्न तो देव जाणावा । अंतरी धरितां बळें ॥ अचूक यत्न तो देवो । चुकणें दैत्य जाणिजे ॥" " कष्टेविण फळ नाहीं । कष्टेविण राज्य नाहीं ॥ आधी कष्टाचे दु:ख सोसिती । ते पुढे सुखाचे फळ भोगिती ॥ आधी आळसें सुखावती । त्यांसी पुढे दु:ख ॥" ' दासबोध ' आणि 'मनाचे श्लोक' या त्यांच्या लिखाणातून त्यांनी मानवधर्माला अनेक शिकवणी दिल्या. त्यांच्या नैतिक आधार आणि मार्गदर्शनाच्या जोरावरच छ.शिवाजी महाराजांनी ' हिंदवी स्वराज्याची ' स्थापना केली. छ.शिवाजी महाराजांनी त्यांना परळीच्या किल्ल्यावर रहाण्याची विनंती केली . कालांतराने त्या किल्ल्याचे नामकरण 'सज्जनगड' असे झाले. शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांना उपदेश करताना स्वामींनी पत्रात लिहिले, "शिवरायास आठवावे। जीवित्व तृणवत मानावे । इहपरलोकी रहावे । कीर्तिरुपें ॥" वेळेपर्यंत रामदासस्वामींच्या अवतार कार्याची समाप्ती आली होती. जाण्यापूर्वी त्यांनी शिष्यांना म्हटले, " माझी काया गेली खरे । परी मी आहे जगदाकारे । करु नका खटपट । पहा माझा ग्रंथ नीट ॥" माघ वद्य नवमी शके १६०३ - सन १६८१ - रोजी रामदासस्वामींनी सज्जनगडावर देह ठेवला.
=======================================================================
रामशास्त्री प्रभुणे
रामशास्त्री प्रभूणेंचा जन्म सातारा जिल्ह्याजवळील 'माहुली' येथे झाला. पेशव्यांच्या काळात त्यांना सर्वोच्च न्याय व्यवस्थेचे सर्वाधिकार प्राप्त झाले होते. नारायण पेशव्यांचा खुन झाल्यानंतर रघुनाथरावांनी स्वतःला 'पेशवा'म्हणून जाहीर केले. नारायणरावांच्या खुनाच्या खटल्या संदर्भात न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी रघुनाथरावांना मरणोत्तर फाशीची शिक्षा सुनावली होती. 'रामशास्त्री' हे नाव त्यांच्या महान धाडसामुळे आणि न्यायामुळे आजही स्मरणात राहिलेले आहे.
======================================================================
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज
सातारचे राजे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज १८१० मध्ये उत्तराधिकारी म्हणून विराजमान झाले. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यनी त्यांच्या काळात अविस्मरणीय कामगिरी केली. उदा .शैक्षणिक क्षेत्र ,पाणी पुरवठा , सातारा ते महाबळेश्वर रस्ता इ. 'महाबळेश्वरला' थंड हवेचे ठिकाण म्हणून स्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. १८३९ पर्यंत त्यांनी राज्य केले. सन १८२३ मध्ये त्यांना रॉयल सोसायटी ऑफ लंडन तर्फे सम्मानित करण्यात आले.
======================================================================
रंगो बापुजी गुप्ते
रंगो बापूजी गुप्ते स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारक होते. सातारचे मराठा राज्य ब्रिटीश राजवटीमध्ये खालसा केल्यानंतर 1839 मध्ये राजे प्रतापसिंह महाराजांनी रंगो बापूजी गुप्ते यांना यासंबंधातील केससाठी ब्रिटीश पार्लमेंटमध्ये पाठवले. तेथे त्यांनी 14 वर्षे संघर्ष केला मात्र त्यांना यश आले नाही. तेथून परत आल्यानंतर 1857च्या उठावातील एक सुत्रधार बनले. ते नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांना भेटले आणि सातारा, कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव या परिसरातून सैन्याची जुळवणी सुरु केली. त्यांचा प्रयत्न उघकीस आल्यानंतर अनेकांना बलीदान द्यावे लागले. 1857 रंगो बापूजी गुप्ते भूमीगत झाले. ते ब्रिटीशांना कधीच सापडले नाहीत.
======================================================================
क्रांतीसिंह नाना पाटील
क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते .
महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात ) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे , तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली . नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती . संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते .
======================================================================
महात्मा जोतीबा फुले
महात्मा जोतीबा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी २० फेब्रुवारी १८२७ झाली झाला . स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत . सप्टेंबर २३, इ .स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली पुरोहितांकडून होणार्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते . मराठीत मंगलाष्टकं रचली बहुजन समाजाचे अज्ञान , दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत . ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला . त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. .१८४८ साली पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली .महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली . तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली . अशा समाजसुधारकाचे २८ नोव्हेंबर १८९०ला निधन झाले .
=====================================================================
कर्मवीर भाउराव पाटील
दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली.
=====================================================================
मा. यशवंतराव चव्हाणसाहेब
स्वातंत्र्य सैनिक,संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेते आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील ,कराड तालुक्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. चव्हाण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या सक्रिय सहभागी होते . 1932 मध्ये सातारा मध्ये भारतीय ध्वज तुरुंगात 18 महिने शिक्षा ठोठावली होती .1940 मध्ये सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बनले . इ .स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली . तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंत १ मे , १९६०महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली . इ .स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली . हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल.पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली .
=====================================================================
राजमाता सुमित्राराजे भोसले
छ.शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी श्रीमंत छ.राजाराम महाराज (आबासाहेब )यांच्या त्या सुनबाई होत. 'कुलवधू'राजमाता सुमित्राराजे भोंसले ह्या जिल्ह्यातील एक आदरणीय व्यक्ती होत्या. त्या अनेक संस्थेंच्या संस्थापक देखील होत्या. मृद हृदयी राजमातांचे निधन ०५ जून १९९९ रोजी झाले.
=====================================================================
मा. गणपतराव देवजी तपासे
गणपतराव देवजी तपासे स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते होते. स्वातंत्र्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातीलमहाराष्ट्रातील नेते बनले. त्यांचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय आणि लॉ कॉलेज शिक्षण पुण्यात झाले. ते मुंबईविधानसभेत सातारा जिल्ह्यातून 1946 आणि 1952 मध्ये निवडून आले . ते 2 एप्रिल 1968 ते 3 एप्रिल 1962 पासूनराज्यसभा सदस्य होते. त्यांनी उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यातील राज्यपाल पद भूषिवले होते.
====================================================================
मा. बाबासाहेब अनंतराव भोसले
बाबासाहेब अनंतराव भोसले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कलेढोण येथे 15 जानेवारी 1921 रोजी झाला. त्यांनी 1951 मध्ये कायद्याची पदवी तसेच बार लॉ इंग्लंड येथे घेतली. त्यांनी सातारा येथे 8 वर्षे कायदाचा सराव केला. त्यानंतर त्यांना दहा वर्षे महाराष्ट्र महसूल ट्रिब्यूनल सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983 महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवीले.
====================================================================
ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव
ऑलिंपीकवीर खाशाबा जाधव यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील,कराड तालुक्यातील 'गोळेश्वर' या गावी अत्यंत गरीब घराण्यात झाला. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते. सन २००० पर्यंत ते एकमेव ऑलिम्पिक मेडल विजेता होते. सन १९९३ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना मरणोत्तर 'शिव छत्रपती'पुरस्काराने सन्मानित केले. तसेच सन २००१ साली केंद्र सरकारने मरणोत्तर 'अर्जुन'पुरस्काराने गौरवले.
====================================================================
चिफ जस्टिस पी. बी. गजेंद्रगडकर
भारताचे माजी मुख्य न्यायाधीश पी. बी. गजेंद्रगडकर यांचा जन्म सातारा येथे 16 मार्च, 1901 रोजी झाला. 1945 मध्ये बॉम्बे हायकोर्टचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. जानेवारी 1956 मध्ये त्यांना सर्वोच्चन्यायालयाच्या खंडपीठावर पाठवण्यात आले. पुढे 1964 मध्ये ते भारताचे मुख्य न्यायाधीश झाले. कायदेशीर व औद्योगिक कायदा यांच्या विकासात त्यांचे योगदान महान आणि अद्वितीय म्हणून घेतले जाते. भारत सरकारच्या विनंतीवरुन त्यांनी केंद्रीय कायदा आयोग , कामगार राष्ट्रीय आयोग आणि बँक पुरस्कार आयोग अशा अनेक कमिशनचे काम पाहिले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून त्यांनी दक्षिण भारतातील गांधीग्राम आयोजित ग्रामीण संस्था येथे कार्य केले.
===================================================================
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
सातारा जिल्ह्यातील थोर व्यक्तीमत्व कै.तर्कतीर्थ लक्ष्मनशास्त्री जोशी हे मराठी विश्वकोष, वाईचे संपादक होते. १९७६ मध्ये भारत सरकारकडून 'पद्मभूषण' पुरस्कार प्राप्त त्यांना झाला. भारताच्या संविधानाचे संस्कृतमध्ये रूपांतरण त्यांनीच केले आहे. सन १९६९ मध्ये मॉस्को येथे आयोजित केलेल्या जागतिक धर्म परिषदेसाठी अमेरिका आणि रशियाच्या सरकारकडून त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. महात्मा गांधीजींनी हिंदू धर्मशास्त्रासाठी प्रमुख सललागार म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.
===================================================================
श्री सदगूरु बाबामहाराज सातारकर
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत. नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी, इ.स. १९३६ रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. सुदृढ शरीरासाठी जशी व्यायामाची गरज असते, तशी निरोगी मनासाठी अध्यात्माची गरज असते. ही गोडी टिकविण्याचे वारकरी संप्रदायाने केले. बाबामहाराज सातारकर हे कीर्तनकलेचा परिपूर्ण आविष्कार आहेत. बाबामहाराजांनी हजारो सुशिक्षित तरुणांना वारकरी संप्रदायाची गोडी लावली.
===================================================================
खालील काही व्यक्तींनी त्यांचे बहुमुल्य योगदान विविध क्षेत्रात दिले आहे.
त्यांच्या या अनन्य साधारण कामगिरीमुळे संपूर्ण देशभरात सातारा जिल्ह्याचे नाव कायम स्मरणात राहिले आहे.
===================================================================
किसन महादेव वीर- स्वातंत्र्य सैनिक,क्रांतिसिंह नाना पाटील यांचा उजवा हात
===================================================================
गोविंद स्वामी आफळे
क्षेत्र माहुली, ता.सातारा
===================================================================
व्ही.जी.उर्फ
अण्णासाहेब चिरमुले -'विमा महर्षी' म्हणून प्रसिद्ध,युनायटेड वेस्टर्न बँकेचे संस्थापक,१९१३ मधील पहिल्या वेस्टर्न इंडिया एन्सुरन्स कंपनीचे संस्थापक.
==================================================================
शाहीर साबळे-आंतरराष्ट्रीय पदक विजेते
==================================================================
निळकंठराव कल्याणी-प्रसिद्ध उद्योजक
================================================================
ध्यानजीभाई कूपर-कूपर कंपनीचे संस्थापक (सातारा)
==================================================================
नंदा जाधव
अंतर राष्ट्रीय दर्जाची खेळाडू (धावपटू)
==================================================================
स्नेहल कदम
आणि सतीश कदम
युवा जलतरणपटु(१० वर्षे) ,भारताच्या इतिहासातील जिब्राल्टरची सामुद्रधुनी तिच्या वडिलांसोबत पोहुन पार करण्याचा विक्रम तिने स्थापित केला.
==================================================================
to be continue...