सातारा प्लस!!!

..... अचानक सकाऴी मुघली फौजांचा रोख पन्हाळगडाच्या दिशेनं वळण्याऐवजी साताराच्या दिशेने वळला. मराठ्यांची राजधानी सातारा !............. दिवस बुडायच्या सुमारास साता-यापासून उत्तरेला कोसभर अंतरावर करंज्याजवळ औरंगझेबाची स्वारी थांबली. ......दोघांनीही किल्ल्यावरुन मारगिरीला सरुवात केली होती.....मुघली तोफांचा मारा किल्ल्यावर बरोबर लागू पडत नव्हता पण किल्ल्यावरुन होणारा मारा माञ आपला काम बिनचूक पार पाडीत होता........ मग घोड्यावरुन खाली उतरुन औरंगझेबानं स्वतः तो लोखंडी गोळा उचलून पाहिला. गोळा खाली टाकून शहाजादा आझमला तो म्हणाला, ``शहाजादे, आपल्या तोफांच्या गोळ्यापेक्षा मराठ्यांचे हे तोफेचे गोळे अधिक चांगले दिसतात.......`` दीड दोन महिने उलटले. वेढ्याचे काम चालूच होतं..... पण उडालेला तो बुरुज अपेक्षेप्रमाणं किल्ल्याच्या आत पडण्याऐवजी बाहेर पडला. त्या प्रचंड पत्थरांच्या खाली किल्ल्यात शिरण्यास उत्सुक असलेली मुघली तुकडी पुरी गारद झाली. पाहता पाहता किल्ल्याची कोसळलेली तटबंदी मुघली फौजेवर एखाद्या यमदूताप्रमाणॆ तुटून पडली. ......औरंगझेबाच्या चर्येवर तीव्र निराशा उमटली. संध्याकाळी खाली मान घालून तो आपल्या करंज्याच्या छावणीत दाखल झाला. राञसुद्धा औरंगझेबाला वैरी झाली होती................ आठ दिवस साता-याच्या किल्ल्यावरच्या उतारावरची ती आग भडकत होती. आपल्या छावणीत निमूटपणे बसून औरंगझेब ती आग पाहत होता. .......
----- अजिंक्यातारा सातारा येथे झालेल्या घनघोर युद्धाचे ना. स. इनामदार यांनी `शहेनशहा`या कादंबरीत केलेले वर्णन वाचकाला खिळवून ठेवते. तसेच पेशवे पदाची सुत्रे सातारच्या गादीने दिली होती. असे इतिहासावरुन ज्ञात होते. तेव्हा सातारची छाती स्फुरण पावते. साता-यातील रंगो बापूजी गुप्ते यांनी 1857 स्वातंत्र युद्धात भाग घेतला होता. त्यानंतर स्वातंत्र्य चऴवळीत सातारा जिल्ह्याने उडी घेतली होती. सातारा शहर तसेच परिसराला मोठा इतिहास आहे. सातारा जिल्ह्यातील कित्येक थोर योद्धे, राजे, संत, थोर व्यक्तिमत्वांनी महाराष्ट्राचा इतिहास घडविला आहे. सातारचे देश पातळीवर नेले आहे. सातारा जिल्ह्यातील अशी व्यक्तिमत्वे, धामिँक, पर्यटन स्थळे, औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, तंत्रज्ञान आदी सर्वच बाबतीत सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या बाबतीत सातारा प्लस आहे. सातारा प्लस केवळ इतिहासच नव्हेतर वर्तमान, भविष्यकाळातही प्लस राहणार आहे, उजवा राहणार आहे.

Welcome to


Satara Plus Blogger


Visit our website : सातारा प्लस


Visitor's can also follow us on

Satara Plus FB

Mauli Google community







email us on - satish.sixteen@gmail.com


1 comment: