Navali Mandir Khavali, नवलाई मंदीर खावली, Khavali, Satara, Maharashtra


श्री नवलाई देवी मंदीर खावली तालुका सातारा जिल्हा सातारा
: शब्दलेखन Satara Plus : 8308456916
वाचन कालावधी 3 तीन मिनीट

सातारा शहराच्या पश्चिमेस साधारण 11 किलोमीटर अंतरावरील कोरेगाव रस्त्यावर असलेल्या खावली गावातील श्री नवलाई देवी मंदीर हे भक्तांचे आकर्षण ठरते. 

मंदरीचे उद्घाटन व कलशारोहण गुरुवार दि. 22.12.2005 रोजी  प. पूज्य सुंदरगिरी महाराज, पुसेगाव यांचे शुभहस्ते संपन्न झाला होता. मंदीराची रचना सुनियोजीत करण्यात आल्याने कोरेगाव रस्यावरुन जाताना सदर मंदीर अतिशय सुरेख दिसते. एकदा तरी मंदीरामध्ये जाऊन श्री नवलाई देवाचा आशिर्वाद घ्यावा अशी ईच्छा झाल्याशिवाय राहत नाही.

या मंदीरामध्ये श्री नवलाई देवी सोबत 
श्री वाघजाई देवी, 
श्री सालपाई देवी, 
श्री पद्रमावती देवी तसेच 
श्री वरदायीनी देवी यांचेही दर्शन घेता येते.

मंदीराची रंगरंगोटी, रेखरखाव उत्कृष्ट असल्याने मंदीर मंदीर परिसर अधिक उठावदार, मोहक ठरतो.

कसे जावे? येथे पहा... 






Limb Satara Maharashtra

लिंब, सातारा – एक प्रेक्षणीय गांव

सातारा शहरापासून 15 ते 20 किलो मीटर अंतरावर असलेले लिंब गाव हे निसर्गाच्या कुशीत वसले आहे. या गावाचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून असलेला दिसून येतो. गावाच्या शेजारीच महाबळेश्वर येथून प्रकट झालेली कृष्णा नदी वाहते. लिंब हे गाव विविध कारणांनी प्रेक्षणिय ठरत आहे. त्यातील काही ठळक प्रेक्षणिय स्थळ अशी सांगता येतील.

1) श्री कोटेश्वर मंदीर – कृष्णा नदीच्या मध्यभागी बांधण्यात आलेले हे कोटेश्वर मंदीर रेखीव स्वरुपाचे आहे. याची रचना इतिहासकालीन दिसून येते. पावसाळी ऋतू मध्ये हे मंदीर पाहण्यासारखे असते. नदी प्रवाहाच्या मध्यभागी असलेले हे मंदीर पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. महाशिवरात्री दिवशी या ठिकाणी मोठी जत्राच भरल्याचे दिसून येते.




2) श्री ब्रम्हचैतन्य सद्रगुरु अण्णा महाराज रेवडीकर विठ्ठल मंदीर देवस्थान – श्री कोटेश्वर मंदीरच्या पश्चिम बाजूस पाच 5 मिनीटांच्या अंतरावरील श्री ब्रम्हचैतन्य सद्रगुरु अण्णा महाराज रेवडीकर विठ्ठल मंदीर देवस्थान ठिकाणी मनस्वी शांती लाभते. येथे तात्या महाराज उर्फ रेवडीकर अण्णा महाराज यांची समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही.  येथून अाजही पायी दिंडी सोहळा नियमीत सुरु असल्याचे दिसून येते.

3) बारा मोटेची विहीर – नुकत्याच काही वर्षांपूर्वी पासून लिंब गावातील बारा मोटेची विहीर ही फार प्रसिद्ध झाली. ही विहीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून आजही भक्कमरित्या अस्तित्वात आहे. या विहीरीची रचनाच अशी आहे आजचे स्थापत्यरचनाकार यांनाही कुतूहल वाटत आहे.  ही विहीर पाहण्यासाठी आवर्जून पर्यटक मोठ्या संख्येने येताना दिसतात.


4) हत्ती घाट – लिंब गावाच्या उत्तर बाजूस कृष्णा नदीच्या काठावर असलेला हत्ती घाट हा पेशवे काळात तयार झाला असावा. अतिशय सुंदर लांब, रुंद असा हा घाट आहे. घाटाच्या काठावर पेशवेकालीन भग्न अवस्थेतील श्री रामेश्वराचे मंदीर आजही अस्तित्वात आहे. शेजारीच नवीन श्री रामेश्वराचे नवीन मंदीर तयार करण्यात आलेले आहे. सायंकाळच्या प्रहरी या हत्ती काठावर संध्या समय हा रमणीय ठरावा असा आहे.
 "हत्ती घाट" व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

लिंब या गावात आजही इतिहासकालीन वाड्यांचे अवशेष पाहावया मिळतात.

योग्य नियोजन, दिशा लाभल्यास लिंब हे गाव पर्यटनस्थळ उदयास नक्कीच येईल असा विश्वास वाटतो.