लिंब, सातारा – एक प्रेक्षणीय गांव
1) श्री कोटेश्वर मंदीर – कृष्णा नदीच्या मध्यभागी बांधण्यात आलेले हे कोटेश्वर मंदीर रेखीव स्वरुपाचे आहे. याची रचना इतिहासकालीन दिसून येते. पावसाळी ऋतू मध्ये हे मंदीर पाहण्यासारखे असते. नदी प्रवाहाच्या मध्यभागी असलेले हे मंदीर पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. महाशिवरात्री दिवशी या ठिकाणी मोठी जत्राच भरल्याचे दिसून येते.
2) श्री ब्रम्हचैतन्य सद्रगुरु अण्णा महाराज रेवडीकर विठ्ठल मंदीर देवस्थान – श्री कोटेश्वर मंदीरच्या पश्चिम बाजूस पाच 5 मिनीटांच्या अंतरावरील श्री ब्रम्हचैतन्य सद्रगुरु अण्णा महाराज रेवडीकर विठ्ठल मंदीर देवस्थान ठिकाणी मनस्वी शांती लाभते. येथे तात्या महाराज उर्फ रेवडीकर अण्णा महाराज यांची समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. येथून अाजही पायी दिंडी सोहळा नियमीत सुरु असल्याचे दिसून येते.
3) बारा मोटेची विहीर – नुकत्याच काही वर्षांपूर्वी पासून लिंब गावातील बारा मोटेची विहीर ही फार प्रसिद्ध झाली. ही विहीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून आजही भक्कमरित्या अस्तित्वात आहे. या विहीरीची रचनाच अशी आहे आजचे स्थापत्यरचनाकार यांनाही कुतूहल वाटत आहे. ही विहीर पाहण्यासाठी आवर्जून पर्यटक मोठ्या संख्येने येताना दिसतात.
4) हत्ती घाट – लिंब गावाच्या उत्तर बाजूस कृष्णा नदीच्या काठावर असलेला हत्ती घाट हा पेशवे काळात तयार झाला असावा. अतिशय सुंदर लांब, रुंद असा हा घाट आहे. घाटाच्या काठावर पेशवेकालीन भग्न अवस्थेतील श्री रामेश्वराचे मंदीर आजही अस्तित्वात आहे. शेजारीच नवीन श्री रामेश्वराचे नवीन मंदीर तयार करण्यात आलेले आहे. सायंकाळच्या प्रहरी या हत्ती काठावर संध्या समय हा रमणीय ठरावा असा आहे.
"हत्ती घाट" व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
लिंब या गावात आजही इतिहासकालीन वाड्यांचे अवशेष पाहावया मिळतात.
योग्य नियोजन, दिशा लाभल्यास लिंब हे गाव पर्यटनस्थळ उदयास नक्कीच येईल असा विश्वास वाटतो.
No comments:
Post a Comment