आंबेनळी घाटातील भीषण अपघात स्थळ झाले "अाठवण पॉईंट"
जूलै 2018 महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघालेली दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस पोलादपूर येथील आंबेनळी घाटात ५०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३३ जण ठार झाले होते.
या अपघाताने पूर्ण महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली.
ज्या स्थळी हा भीषण अपघात झाला होता त्याची आठवण - स्मृती म्हणून या स्थळाचे नाव आठवण पॉईंट असे करण्यात आले आहे.
महाबळेश्वरमध्ये अनेक पॉईंट्स आहेत जे इंग्रजांनी शोध लावले आणि ज्या ब्रिटीश लोकांनी शोध लावले त्यांचे नावाने त्या पॉईंट्सला आजही ओळखले जाते. (या पॉईंट्स मराठीत विशेषत: छत्रपतीं शिवाजी महाराज त्यांचे शूर मावळे यांचे नावाने बदल होणेसाठी प्रयत्न होणे आवश्यक)
आठवण पॉईंट ला खूप आगळे महत्व प्राप्त झाले आहे. मराठी नाव असलेला हा एकमेव पॉईंट असेल. मात्र ही आठवण हृदयद्रावक आहे.
या पॉईंटवरुन प्रवास करणा-या सर्वांनाच हा आठवण पॉईंट या ठिकाणी झालेल्या भीषण हृदयद्रावक अपघाताची आठवण कायम करुन देणारा आहे.
No comments:
Post a Comment