उद्योजकता प्रेरक...
श्री संत सावता माळी महाराज
कर्म हेच मर्म याची जाणीव करुन देणारे संत शिरोमणी श्री संत सावता माळी. आजही समाजाला आपल्या कामजातून परमार्थ साधता येऊ शकतो, आपल्या कार्यावर निष्ठा, जिद्द (Loyalty) ठेवली तर अशक्य गोष्टही शक्य होवू शकते याची अनुभूती देणारे संत म्हणजे श्री संत सावता माळी.
“कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी” असे म्हणत श्री संत सावता माळी यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिलेला उद्योजकीय मंत्र आजही तितकाच लागू पडतो. साक्षात पांडूरंगालाही आपल्या भक्ताने फुलविलेला मळा पाहण्याची ओढ लागावी आणि त्या ओढीने तो भक्ताला भेटण्यासाठी स्वत: भक्ताच्या मळ्यात जावा एवढी उद्योजकीय एकाग्रता (Entrepreneurial concentration)...!!!
श्री संत सावता माळी उद्योजकीय गुणांचा (Entrepreneurial qualities) खूप मोठा साठा आहे, कितीही संकटे आली तरी आपल्या कर्तव्यापासून न ढळता एकाग्रताने त्यांनी साक्षात भगवंताला आपलेसे केले. पांडूरंगास काय पडले हो भक्ताच्या घरी तेही मळ्यात जायाला. त्यास काय कमी भक्त आहेत का... पण श्री संत सावता माळी यांचे कार्यच एवढे थोर की पांडूरंगास मोह झाला... धन्य ते श्री संत सावता माळी महाराज.
आषाढी वारी साठी अनेकजण पंढरीला जातात, पांडूरंगाच्या चरणी लीन होतात. मात्र आजही पांडूरंगाची वारी निघते ती श्री संत सावता माळी यांचे मळ्यात भेंडी अरण, जि. सोलापूर या ठिकाणी.
No comments:
Post a Comment