वाढेफाटा चौकातील भीषण अपघातांपासून मुक्ती...
राष्ट्रीय महामार्ग NH4 हा सातारा शहाराच्या अगदी जवळून जातो.
सातारा शहरात उत्तर बाजूकडून प्रवेश करताना तसेच लोणंद, फलटण याकडे जाण्यासाठी व महामार्गावर पुणे-मुंबई या बाजूला जाताना व कराड, कोल्हापूर ते बेंगलोर असा चौक वाढे गावा सिमेलगत झालेला आहे.
या वाढेफाटा चौकामध्ये अनेक गंभीर अपघात यापूर्वी होत होतो. अनेक जणांना या अपघांतामुळे जीव गमवावा लागला आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या सहा 6 पदरीकरणाच्या कार्यक्रमात या चौकामध्ये पूलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुणे-मुंबई तसेच मुंबई-कराड-कोल्हापूर हा मार्ग पूलावरून वाहने जाण्यासाठी खुला झाला आहे.
तसेच सातारा शहरातील प्रवेश सब रस्त्याने आणि लोणंद-फलटण मार्ग हा पुलाखालून गेला आहे.
यामुळे या चौकातील होणा-या भीषण अपघतांपासून वाढेफाटा चौक मुक्त झाला आहे असे म्हणणे अगदी योग्य ठरते.
तसेच शिवराज पेट्रोल पंप येथेही असाच पूल उभारल गेल्याने तेथीलही चौकातील अपघताचे प्रमाण नाहीसे झालेचे चित्र असल्याचे दिसून येते.
No comments:
Post a Comment