Poladpur Ambenali Valley accident place remember as Athwan आठवण Point

आंबेनळी घाटातील भीषण अपघात स्थळ झाले "अाठवण पॉईंट"



जूलै 2018 महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघालेली दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस पोलादपूर येथील आंबेनळी घाटात ५०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३३ जण ठार झाले होते.


या अपघाताने पूर्ण महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली.

ज्या स्थळी हा भीषण अपघात झाला होता त्याची आठवण - स्मृती म्हणून या स्थळाचे नाव आठवण पॉईंट असे करण्यात आले आहे. 

महाबळेश्वरमध्ये अनेक पॉईंट्स आहेत जे इंग्रजांनी शोध लावले आणि ज्या ब्रिटीश लोकांनी शोध लावले त्यांचे नावाने त्या पॉईंट्सला आजही ओळखले जाते. (या पॉईंट्स मराठीत विशेषत: छत्रपतीं शिवाजी महाराज त्यांचे शूर मावळे यांचे नावाने बदल होणेसाठी प्रयत्न होणे आवश्यक)

आठवण पॉईंट ला खूप आगळे महत्व प्राप्त झाले आहे. मराठी नाव असलेला हा एकमेव पॉईंट असेल. मात्र ही आठवण हृदयद्रावक आहे.

या पॉईंटवरुन प्रवास करणा-या सर्वांनाच हा आठवण पॉईंट या ठिकाणी झालेल्या भीषण हृदयद्रावक  अपघाताची आठवण कायम करुन देणारा आहे.

Wade Phata Bridge Satara


वाढेफाटा चौकातील भीषण अपघातांपासून मुक्ती...




राष्ट्रीय महामार्ग NH4 हा सातारा शहाराच्या अगदी जवळून जातो. 

सातारा शहरात उत्तर बाजूकडून प्रवेश करताना तसेच लोणंद, फलटण याकडे जाण्यासाठी व महामार्गावर पुणे-मुंबई या बाजूला जाताना व कराड, कोल्हापूर ते बेंगलोर असा चौक वाढे गावा सिमेलगत झालेला आहे. 

या वाढेफाटा चौकामध्ये अनेक गंभीर अपघात यापूर्वी होत होतो. अनेक जणांना या अपघांतामुळे जीव गमवावा लागला आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या सहा 6 पदरीकरणाच्या कार्यक्रमात या चौकामध्ये पूलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुणे-मुंबई तसेच मुंबई-कराड-कोल्हापूर हा मार्ग पूलावरून वाहने जाण्यासाठी खुला झाला आहे.

तसेच सातारा शहरातील प्रवेश सब रस्त्याने आणि लोणंद-फलटण मार्ग हा पुलाखालून गेला आहे.

यामुळे या चौकातील होणा-या भीषण अपघतांपासून वाढेफाटा चौक मुक्त झाला आहे असे म्हणणे अगदी योग्य ठरते.

तसेच शिवराज पेट्रोल पंप येथेही असाच पूल उभारल गेल्याने तेथीलही चौकातील अपघताचे प्रमाण नाहीसे झालेचे चित्र असल्याचे दिसून येते.

Indian Independence Day 2018




ये देश है वीर जवानों का अलबेलों का मस्तानों का



15 ऑगस्ट 2018 रोजी आपण आपला 72 वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतोय.

स्वातंत्र्याची पंचाहत्तरी 75 गाठायला फक्त 3 तीनच वर्षे शिल्लक आहेत.

या दिवशीचा देश भरातील उत्साह काही औरच पाहायला मिळतो. घरातील छोट्या जवानांचे नटून थटून शाळेत जाऊन प्रभात फेरी मारणे, राष्ट्रगीत म्हणणे. त्यानंतर शाळेतील मिळणा-या खाऊ वर लक्ष असणे हे अल्हाददायक आहे.

मोठे-वयस्कर  जवानांचे देखील या दिवशी सकाळी किमान 11 पर्यंत उत्साहित धांदल पाहावया मिळते. घरी जाताना गरम जिलेबी तीही बारिक काठ असलेलीच सोबत फरसाणा असलाच पाहिजे. हे खात खात दिवस कधी संपतो समजत नाही.

फेसबूक, व्हॉट्सअप, टिव्टर, इन्टाग्राम या सारख्या सोशल मिडीयावर देशभक्तीपर होणारा पोस्ट्सचा पूर हाही मोठ्या प्रमाणातच... संध्याकाळी किती लाईक्स, कॉमेंटस् मिळाल्या यावर उत्सुकता हाही याच दिवशी पाहायला मिळते.

तस पाहिलं तर प्रत्येक नागरीक हा जवानच म्हटला पाहिजे... कारण देशप्रेम म्हटलं प्रत्येक भारतीय नागरीक हा आपले वय विसरून जातो मग तो लहान असो वा वयस्कर...

तिरंग्यास सलामी देताना तो जवानच असतो...

नया दौर या चित्रपटातील " ये देश है वीर जवानों का अलबेलों का मस्तानों का " या गाण्यातून हे खूप सुरेख मांडले आहे....

गीत पहा...

गीत वाचा...

ये देश है वीर जवानों का अलबेलों का मस्तानों का
ओ ...
ओ ... अति वीरों की
ये देश है वीर जवानों का 
अलबेलों का मस्तानों का
इस देश का यारों ... होय!! 
इस देश का यारों क्या कहना 
ये देश है दुनिया का गहना

ओ... ओ...
यहाँ चौड़ी छाती वीरों की
यहाँ भोली शक्लें हीरों की
यहाँ गाते हैं राँझे ... होय!!
यहाँ गाते हैं राँझे मस्ती में
मस्ती में झूमें बस्ती में

ओ... ओ...
पेड़ों में बहारें झूलों की
राहों में कतारें फूलों की
यहाँ हँसता है सावन ... होय!!
यहाँ हँसता है सावन बालों में
खिलती हैं कलियाँ गालों में

ओ... ओ...
कहीं दंगल शोख जवानों के
कहीं कर्तब तीर कमानों के
यहाँ नित नित मेले ... होय!!
यहाँ नित नित मेले सजते हैं
नित ढोल और ताशे बजते हैं

ओ... ओ...
दिलबर के लिये दिलदार हैं हम
दुश्मन के लिये तलवार हैं हम
मैदां में अगर हम ... होय!! 
मैदां में अगर हम दट जाएं
मुश्किल है के पीछे हट जाएं

हुर्र हे !! हा!!
हुर्र हे !! हा!!
हुर्र हे !! हा!
अड़िपा! अड़िपा! अड़िपा!

Inspirational Entrepreneurial Qualities : Sant Savata Mali Maharaj

 उद्योजकता प्रेरक...

श्री संत सावता माळी महाराज












कर्म हेच मर्म याची जाणीव करुन देणारे संत शिरोमणी श्री संत सावता माळी. आजही समाजाला आपल्या कामजातून परमार्थ साधता येऊ शकतो, आपल्या कार्यावर निष्ठा, जिद्द (Loyalty) ठेवली तर अशक्य गोष्टही शक्य होवू शकते याची अनुभूती देणारे संत म्हणजे श्री संत सावता माळी.


कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणत श्री संत सावता माळी यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिलेला उद्योजकीय मंत्र आजही तितकाच लागू पडतो. साक्षात पांडूरंगालाही आपल्या भक्ताने फुलविलेला मळा पाहण्याची ओढ लागावी आणि त्या ओढीने तो भक्ताला भेटण्यासाठी स्वतभक्ताच्या मळ्यात जावा एवढी उद्योजकीय एकाग्रता (Entrepreneurial concentration)...!!!

श्री संत सावता माळी उद्योजकीय गुणांचा (Entrepreneurial qualities) खूप मोठा साठा आहे, कितीही संकटे आली तरी आपल्या कर्तव्यापासून न ढळता एकाग्रताने त्यांनी साक्षात भगवंताला आपलेसे केले. पांडूरंगास काय पडले हो भक्ताच्या घरी तेही मळ्यात जायाला. त्यास काय कमी भक्त आहेत का... पण श्री संत सावता माळी यांचे कार्यच एवढे थोर की पांडूरंगास मोह झाला... धन्य ते श्री संत सावता माळी महाराज.


आषाढी वारी साठी अनेकजण पंढरीला जातात, पांडूरंगाच्या चरणी लीन होतात. मात्र आजही पांडूरंगाची वारी निघते ती श्री संत सावता माळी यांचे मळ्यात भेंडी अरण, जि. सोलापूर या ठिकाणी.


भक्तीचा मळा (चित्रपट पाहण्यासाठी लिंकवर जा)