My-Gov Corona Help-desk | Prepare Don't Panic



This WhatsApp Chatbot has been renamed as MyGov Corona Helpdesk and will be available to all users. All you have to do is save this number in the contact.

While rumors about Corona are raining on social media, the central government has taken steps to provide accurate information.



WhatsApp is widely used to spread rumors on social media. Due to this, the central government has activated the chatbot on this platform. This way you can get answers by asking questions


This step has been taken to prevent Corona rumors, and how can the Coronavirus spread? There are answers to questions like how to reduce its infection.

The chatbot will then send you the question. It has the answers A, B, C, D. Because chatbots are robotic software, they do not understand your language.
This will allow the chatbot to send replies to a letter option that he or she understands. In each message, you will be given a helpline number, email and a link to the YouTube video.


MYGOV CORONA HELPDESK No. 

+91 9013151515 

24x7 Medical Help :

Phone : +91-11-23978046

Toll Free Numer : 1075

Email : ncov2019@gov.in

The Historical Samadhi's at Sangam Mahuli, Satara Maharashtra


सातारा ही मराठ्यांची चौथी राजधानी म्हणून ओळखली जाते. औरंगजेबाच्या मृत्युनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचे राजपुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा ही मराठा साम्राज्याची चौथी राजधानी म्हणून घोषीत केली. त्यांनी सातारा शहराची निर्मिती केली. सातारा शहर हे आजही कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून दूर आहे हे छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीनुसार स्थापन झालेल्या सातारा शहराच्या रचनेमुळेच. 
पेवश्यांना मराठा साम्राज्याची सुत्रे साताराच्या राजधानीनेच बहाल केली होती. 
संगम माहूली गाव तसे सातारा शहरापासून काही किलोमीटर अंतरावर कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. याच ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे नदीच्या काठी आहेत. या समाध्या तशा नदीच्या काठावर आहेत. 


दुर्देवाची बाब ही की या समाध्यांची आजतागाय म्हणजे सन 2020 पर्यंत या समाधी स्थळाकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. ही खर तर अक्षम चूक म्हणावी लागेल. 
छत्रपती राजाराम महाराज भोसले यांच्या पत्नी महाराणी ताराबाई भोसले छत्रपती या अत्यंत शूर, लढवय्या महाराणी. औरंगजेबास शेवटपर्यंत त्राही त्राही करुन सोडणा-या, मराठा साम्राज्य वाढवणा-या महाराणी ताराबाई होत.
"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी | ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली || ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते|”
या शब्दात महाराणी ताराबाई यांचे वर्णन केले जाते.
छत्रपती शाहू महाराज तसेच छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या समाध्यांचा कधी जिर्णोद्धार होणार याचे उत्तर कोणीही शोधत नाही हे मोठे दुर्देव मानले गेले पाहिजे. 

छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय घोषणा देऊन उपयोग आहे का याचा विचार आजच्या तरुण मावळ्यांनी करणे आवश्यक आहे. बलिदान मास पाळतात खूप छान आहे, गड परिक्रमा करतात हेही सुरेख आहे. मात्र छत्रपती घराण्याच्या या समाध्यांकडे पूर्ण दुर्लक्ष ही खंत...
संगम माहूली ग्रामपंचायत, सातारा नगरपालिका, शासन यांनी आजपर्यंत काहाही ठोस पाऊले न उचलल्यामुळे या थोर विभूतींच्या समाध्या आजही जिर्णोद्धाराची वाट पाहत उन वारा पाऊस झेलत आहेत. साताराच्या ही प्रेरणादायक स्थळे कधी पुढे येऊन जिल्हापातळीवर, राज्यपातळीवर, देशपातळीवर येऊन त्यांची महती जगापुढे जाणार हे एक न उगमलेले कोडेच आहे...

The war against Aurangzeb on the fort Ajinkyatara, Satara Maharashtra




किल्ले अजिंक्यतारावरील औरंगजेबा विरुद्ध घनघोर युद्ध



किल्ले विशाळगडावर औरंगजेबाच्या सैन्याची प्रचंड दानादान उडाली. महापूरात त्याची प्रचंड हानी झाली. त्याच्या सैन्याचे धैर्य केव्हाच खचले होते. घोडे, हत्ती, सैन्य, संपत्ती पाण्यात वाहून गेली होती. उरलेले सैन्य सोबत घेऊन त्याची स्वारी क-हाडच्या दिशेने निघाली, खरतर त्याला पुन्हा पन्हाळगडावर जायचे होते. पण त्याच्या डोक्यात मराठ्यांची राजधानीला संपवायचेच ही वेडी अतिमहत्वकांक्षा त्याल शांत बसू देत नव्हती. सकाळच्या प्रहरीच मुघली फौजांचा मोर्चा साताराच्या दिशेने वळला. मराठ्यांची राजधानी सातारा !............. 

सांयकाळच्या सुमारास साताराच्या उत्तरेस असलेल्या करंजे गावामध्ये औरंगजेबाची  स्वारी थांबली. समोर होता किल्ले अजिंक्यतारा. त्याचे डोळे चमकले ... चेह-यावर स्मितहास्य आले... अरे हा तर आपण एका दिवसात घेऊ शकतो हा गड घेतला की मराठा साम्राज्य संपले या विचाराने तो मनोमन आनंदी झाला. मरगळेल्या फौजांना तयार राहण्याचे आदेश दिले. लगचेच तोफांचा मारा सुरु केला. 

मुळातच किल्ले अजिंक्यताराची रचना एवढी कठीण होती ती त्याच्या तोफांचा मारा किल्ल्याला लागूच पडत नव्हता. पण किल्यावरून होणारा तोफांचा मारा त्याचे सैन्य सहज टिपत होता. त्याने गडास वेढा घातला गड पार करुन जाणे सहज शक्य नव्हते हे त्याला 700 ते 800 सैन्य गमावल्यानंतर समजले. गडावर कोणत्याही बाजूने चढाई करुन जाणे अशक्यप्राय गोष्ट होती. 

मराठा सरदार आणि मावळे हे काय चीज आहेत हे त्याने आजवरच्या अनुभवातून जाणले होते. 

एका दिवसाच काम त्याला आता कठिण वाटू लागले. पंधरा वीस दिवस तोफांचा मारा करुन काहीही हातास लागत नव्हते. किल्ल्यावरुन मात्र तोफांचा चौफेर मारा त्याचे सैन्य करु शकत नव्हते. तो मागे हटला. काही दिवस शांत बसला. या कालावधीत गडावरील मावळ्यांना तयारीसाठी पुन्हा वेळ मिळाला.

आजुबाजूच्या परिसातील मोठाली वृक्षे तोडून लाकडांचा दमदमा उभारण्यास मुघली फौजांनी सुरुवात केली. त्यावेळी किल्ले अजिंक्यताराचा परिसर बहुतांश जंगलानेच व्यापला होता. फौजेने जवळपासची बहुतांश वृक्षे तोडून जवळपास गडाच्या उंचीचा लाकडांचा दमदमा उभा केला. या कालाधी गडावरील एक तोफगोळा सरळ औरंगजेबाच्या पुढ्यात येऊन पडला होता. तो जर उडाला असला तर औरंगजेब तिथेच ठार झाला असता. या प्रकारमुळे तोही गांगारुन गेला, तोफेचा गोळा हाताने उचलून शहजादा आझम यांस बोलला मराठ्यांचे तोफगोळे आपल्या पेक्षाही चांगले आहेत, असे तोफगोळे आपल्याला हवेत. शहजादा आझम आणि सभोवतालच्या सैन्याची या प्रकारामुळे गाळण उडाली होती.

दमदम्यावर तोफा चढवल्या गेल्या आणि तब्बल दोन महिन्यांनी पुन्हा मुघली फौजांकडून पुन्हा तोफमारा सुरु झाला. तरीही गोळे आत पडत नव्हते. दीड दोन महिने उलटले वेढ्याचे काम चालूच होते.
खब-यांकडून बातमी काढून मंगळाईचा बुरुज उडवून किल्ल्यात प्रवेश करायचा पक्के झाले. मंगळाईचा बुरुज गडावर विजय मिळवून देणारा होता हे मनोमन पटल्यानंतर हताश झाल्या औरंगजेबाने आणखी केली. सर्व सैन्याला तयार राहण्याची ताकीद दिली. गडावर ही खबर मिळाली. मुघल सैन्य आत येताच त्याला कापून काढायची तयारी त्यावेळचा किल्लेदार प्रयागजी प्रभू यांनी केली.
तो दिवस आला. एका बाजूला गडाच्या आत जाण्यासाठी दबा धरून बसलेले मुघली सैन्य दुस-या बाजूला त्या सैन्याला कापून काढण्यासाठी सज्ज झालेले मावळे. दोघेही तयारीत. तोफेचा गोळा उडाला बुरूजावर जाऊन फुटला मुघली सैन्याला प्रचंड आनंद झाला. पण...
उडालेला भला मोठा दगडांचा बुरूज किल्ल्याच्या आत न पडता आत जाण्यासाठी आतुर झालेल्या मुघली सैन्यावर यमदुताप्रमाणे पडला. पाहता पाहता किल्ल्याची कोसळलेली तटबंदी हजारो मुघली सैन्याच्या अंगावर पडली. होत्याचे नव्हते झाले. हजारो सैन्य त्या दगडांच्या खाली गाडले गेले. तसेच येणा-या सैन्याला कापून काढण्यासाठी सज्ज झालेल्या मावळ्यांचेही नुकसान झाले.
ढिगा-यातून कोणाला बाहेर काढायचे कोण मुघल कोण मावळा हेही समजणे अशक्य झाले. तशाच उभा केलेल्या प्रचंड लाकडांच्या दमदम्यास आग लावली गेली कारण मृत्युमुखी पडलेल्या सैन्याची विल्हेवाट लावणे एवढे सोपे नव्हते.
इकडे औरंगझेबाच्या चर्येवर तीव्र निराशा उमटली. संध्याकाळी खाली मान घालून तो आपल्या करंज्याच्या छावणीत दाखल झाला. राञसुद्धा औरंगझेबाला वैरी झाली होती. आठ दिवस साता-याच्या किल्ल्यावरच्या उतारावरची ती आग भडकत होती. आपल्या छावणीत निमूटपणे बसून औरंगझेब ती आग पाहत होता. या शिवाय त्याच्याकडे काहीच पर्याय नव्हता. किल्ल्यावरील मावळेही हाताश झाले होते आगच एवढी प्रचंड होती. दोन्हीकडील सैन्याचे प्रचंड नुकसान झाले. गेली चार महिने कोणाचीही मदत न घेता गडावरील मावळे औरंगजेबाचा मुकाबला करीत होते. त्याला चांगलेच जेरीस आणले. शेवटी गडावरील रसद कमी पडली. तोफगोळे रिकामे झाले. अनेक मावळे गमावले, जायबंदी झाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने पेटलेली ज्योत मावळ्याच्या रक्तात भिनलेली होती.
आग पूर्ण शांत झाल्या नंतर अगदी म्हसवे गावापासून त्याने पुन्हा तोफांचा मारा सुरु केला. मारा करत करत किल्याजवळ आला. तटबंदी पडल्यामुळे किल्ल्यात प्रवेश करणे शक्य झाले... मरण जवळ आलेल्या औरंगजेबास अजिंक्यातारा तब्बल चार पाच महिन्यांनी जिंकता आला.
अशी अजिंक्यताराची औरंगजेबास जेरीस आणणारी लढाई...!!!
धन्य ते मावळे आणि किल्लेदार...

छत्रपती शिवाजी महाराज की जय !!! हर हर महादेव...

5 Essential Information Related to the Corona Virus




कोरोना व्हायरस संबंधात निगडीत असणारी 5 आवश्यक माहितीमय बाबी




1) चिकन / मटन खाल्ल्याने कोरोना आजार होतो काय...

भारतीय खाद्य संस्कृती श्रेष्ठ आहे. भारतात प्रत्येक अन्न हे पूर्ण शिजवल्यानंतरच खाल्ले जाते. अर्धवट कच्चे अन्न भारतात सहसा कोणी खात नाही. भारतात असणा-या कोंबड्या, शेळी यांना कोरोना आजार झालेला नाही, त्यामुळे चिकन/मटन खाल्ल्याने कोरोना होतो हे साफ चूक आहे. हा मांसाहार जास्त आणि पूर्ण 90 ते 100 अंश सेल्सिअसला उकळून चांगला खाणे उत्तम.

2) पाळीव प्राण्यांहून कोरोनाचा धोका आहे काय...

आता पर्यंत असे आढळलेले नाही की पाळीव जनावरांमुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढतो. तरी जनावरांना हात लावल्यावर साबणाने स्वच्छ हात धुणे आवश्यक आहे.

3) मास्क वापरलेच पाहिजे का...

कोरोना संक्रमित रुग्णांसोबत काम करणारे हेल्थ केअर वर्कसला N95 मास्क घालणे आवश्यक आहे. सामान्य लोक ज्यांच्याकडे असे कोणतेही लक्षण नाही त्यांना कोणत्याही मास्कची तशी आवश्यकता नाही. तरी जर आपण सामान्य मास्क घालत असाल तर आपल्या आरोग्यासाठी लाभदायकच ठरु शकेल.

4) सॅनिटायझर वापरलेच पाहिजे काय...

सॅनिटायझरमध्ये स्पिरीट असते जे उडून जाते, त्याने तळहात कोरडे होतात. सॅनिटायझरचा वापर सामान्य लोक प्रवासामध्ये मुख्यत: करताना दिसून येतात. रोजच सॅनिटायझर अनेक वेळा वापरणे हेही त्वचेसाठी अयोग्य ठरु शकते. हॅण्डग्लोजचा वापर करणे हाही पर्याय असू शकतो.

5) हात कधी धूवावेत...

बाहेरून घरी आल्यावर तसेच ऑफिसमध्ये पोहचल्यावर मुख्यत्वे हात पाय स्वच्छ धुणे आवश्यक आहेच (ही सवय ग्रामीण भागात आहेच). तसेच अंगातील कपडे बदलणे, कपडे रोज धूणे, बाहेरून आल्यावर कपडे बाजूला काढून ठेवणे, चपला, बूट तसेच वाहने पाण्याने धूणे याही गोष्टी होणे गरजेचे आहे.

आपण स्वच्छ राहूच पण त्याच बरोबर आपण राहत असलेला परिसरही स्वच्छ ठेवणे तेवढेच आवश्यक आहे. स्वच्छता वसा घेतला तर कोरोनाच काय कोणताच आजार फार काळ तग धरु शकणार नाही

Satara Kandi Pedha History in Marathi

सातारी पे़ढ्यांची गोष्ट

सातारच्या पेढ्यांना "कंदी पेढे" असंच का म्हणतात?

pedheSatara

गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची. भारतात ब्रिटीश राजवट सुरु होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटीश रिजंट बसवण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.

सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्याकाळात शेतीचं प्रमाण कमी होतं. लोकांच उपजीविकेचं साधन मुख्यसाधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी म्हैशीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं.
हे दुध जवळच मोठं शहर म्हणून सातारला पाठवून दिलं जायचं.

काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटीशांना ही मिठाई प्रचंड आवडली.
त्यांना "करंडी" म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला "कँडी" म्हणायला सुरवात केली. पुढे याच कँडीचं आपल्या सातारकरांनी "कंदी" केलं.
साधारण याच काळात छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबाना साताऱ्यात आणून वसवलं होतं. त्यांनी बनवलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच लाटकर अस ओळखलं जाऊ लागलं.

कंदी पेढ्याला सातासमुद्रापार नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी.
त्यांनी सत्तर वर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहचला.
आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊनदेखील मोदी आणि लाटकर हलवाई  मात्र  कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊपणा वाढतो.
म्हणूनच गेली १०० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे.

भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्याची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूर राम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखलं जात.

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो.

सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल भाजलेले आहेत, हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या गाई म्हैशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या पेढ्यांमध्ये सातारच्या माणसांचा "स्वॅग" मिक्स झालाय.

या सगळ्या मुळे सातारच्या पेढ्याचा ब्रँड जगात फेमस झालाय.