पेवश्यांना मराठा साम्राज्याची सुत्रे साताराच्या राजधानीनेच बहाल केली होती.
संगम माहूली गाव तसे सातारा शहरापासून काही किलोमीटर अंतरावर कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. याच ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे नदीच्या काठी आहेत. या समाध्या तशा नदीच्या काठावर आहेत.
दुर्देवाची बाब ही की या समाध्यांची आजतागाय म्हणजे सन 2020 पर्यंत या समाधी स्थळाकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. ही खर तर अक्षम चूक म्हणावी लागेल.
छत्रपती राजाराम महाराज भोसले यांच्या पत्नी महाराणी ताराबाई भोसले छत्रपती या अत्यंत शूर, लढवय्या महाराणी. औरंगजेबास शेवटपर्यंत त्राही त्राही करुन सोडणा-या, मराठा साम्राज्य वाढवणा-या महाराणी ताराबाई होत.
"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी | ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली || ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते|”
या शब्दात महाराणी ताराबाई यांचे वर्णन केले जाते.
छत्रपती शाहू महाराज तसेच छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या समाध्यांचा कधी जिर्णोद्धार होणार याचे उत्तर कोणीही शोधत नाही हे मोठे दुर्देव मानले गेले पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय घोषणा देऊन उपयोग आहे का याचा विचार आजच्या तरुण मावळ्यांनी करणे आवश्यक आहे. बलिदान मास पाळतात खूप छान आहे, गड परिक्रमा करतात हेही सुरेख आहे. मात्र छत्रपती घराण्याच्या या समाध्यांकडे पूर्ण दुर्लक्ष ही खंत...
संगम माहूली ग्रामपंचायत, सातारा नगरपालिका, शासन यांनी आजपर्यंत काहाही ठोस पाऊले न उचलल्यामुळे या थोर विभूतींच्या समाध्या आजही जिर्णोद्धाराची वाट पाहत उन वारा पाऊस झेलत आहेत. साताराच्या ही प्रेरणादायक स्थळे कधी पुढे येऊन जिल्हापातळीवर, राज्यपातळीवर, देशपातळीवर येऊन त्यांची महती जगापुढे जाणार हे एक न उगमलेले कोडेच आहे...
No comments:
Post a Comment