कोरोना व्हायरस संबंधात निगडीत असणारी 5 आवश्यक माहितीमय बाबी
1) चिकन / मटन खाल्ल्याने कोरोना आजार होतो काय...
भारतीय खाद्य संस्कृती श्रेष्ठ आहे. भारतात प्रत्येक अन्न हे पूर्ण
शिजवल्यानंतरच खाल्ले जाते. अर्धवट कच्चे अन्न भारतात सहसा कोणी खात नाही. भारतात
असणा-या कोंबड्या, शेळी यांना कोरोना आजार झालेला नाही, त्यामुळे चिकन/मटन
खाल्ल्याने कोरोना होतो हे साफ चूक आहे. हा मांसाहार जास्त आणि पूर्ण 90 ते 100
अंश सेल्सिअसला उकळून चांगला खाणे उत्तम.
2) पाळीव प्राण्यांहून कोरोनाचा धोका आहे काय...
आता पर्यंत असे आढळलेले नाही की पाळीव जनावरांमुळे कोरोना संक्रमणाचा
धोका वाढतो. तरी जनावरांना हात लावल्यावर साबणाने स्वच्छ हात धुणे आवश्यक आहे.
3) मास्क वापरलेच पाहिजे का...
कोरोना संक्रमित रुग्णांसोबत काम करणारे हेल्थ केअर वर्कसला N95 मास्क घालणे आवश्यक
आहे. सामान्य लोक ज्यांच्याकडे असे कोणतेही लक्षण नाही त्यांना कोणत्याही मास्कची
तशी आवश्यकता नाही. तरी जर आपण सामान्य मास्क घालत असाल तर आपल्या आरोग्यासाठी
लाभदायकच ठरु शकेल.
4) सॅनिटायझर वापरलेच पाहिजे काय...
सॅनिटायझरमध्ये स्पिरीट असते जे उडून जाते, त्याने तळहात कोरडे होतात.
सॅनिटायझरचा वापर सामान्य लोक प्रवासामध्ये मुख्यत: करताना दिसून येतात. रोजच सॅनिटायझर अनेक
वेळा वापरणे हेही त्वचेसाठी अयोग्य ठरु शकते. हॅण्डग्लोजचा वापर करणे हाही पर्याय
असू शकतो.
5) हात कधी धूवावेत...
बाहेरून घरी आल्यावर तसेच ऑफिसमध्ये पोहचल्यावर मुख्यत्वे हात पाय
स्वच्छ धुणे आवश्यक आहेच (ही सवय ग्रामीण भागात आहेच). तसेच अंगातील कपडे बदलणे, कपडे
रोज धूणे, बाहेरून आल्यावर कपडे बाजूला काढून ठेवणे, चपला, बूट तसेच वाहने पाण्याने धूणे याही
गोष्टी होणे गरजेचे आहे.
आपण स्वच्छ राहूच पण त्याच बरोबर आपण राहत असलेला परिसरही स्वच्छ ठेवणे तेवढेच आवश्यक आहे. स्वच्छता वसा घेतला तर कोरोनाच काय कोणताच आजार फार काळ तग धरु शकणार नाही
No comments:
Post a Comment