ऑनलाईन शिक्षण | संकटकालीन वेळ मारुन नेण्याची गरज...
महाराष्ट्रात जेव्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागले तेव्हा खरतर शालेय शैक्षणिक वर्ष संपत चालले होते. त्यामूळे कोरोनाचा शिक्षणावर होणारा संभाव्य परिणाम त्यावेळेपासून कोणीही गांभिर्याने घेतला नाही. दोन तीन महिन्यांमध्ये कोरोना जाईल. पूर्वीसारखे सगळे सुरळीत होईल याचा विश्वास सर्वांचाच होता. पण तसे झाले नाही. साधारणपणे जून महिन्यात शाळा सुरु होतात. शाळा सुरु व्हावी यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शैक्षणिक साहित्य निर्माण करणारे त्याची विक्री करणारे, खाजगी शिकवणी घेणारे असे सर्वचजण आतुतरतेने वाट पाहत असतात. हा एक फार मोठा व्यवसायही आहे हे नाकारता येत नाही.
कोरोनाने सर्वांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. तो वाढतच आहे. सामाजिक संक्रमण रोखण्यासाठी शासनाचे यशस्वी प्रयत्नही खूप मोलाचे आहेत. शिक्षण महत्वाचच.... याला एक उत्तम पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणाकडे पाहले जात आहे. तस पाहायला गेल तर आपल्या भारतीय लोकांची मानसिकता अशी आहे की जे काही नवीन असेल त्यावर प्रथम टिका करायची नंतर ते अंगवळणी पाडून घ्यायचं...
कोरोनाच्या काळात पहिल्या सारख्या शाळा बिनधास्तपणे चालू करणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे हे शासन, पालक, शिक्षक या सर्वांना पटले आहे. त्यामुळेच नाखुशीने का होईना ऑनलाईन शिक्षणाकडे पाऊले वळवण्याशिवाय सध्या तरी काहीही पर्याय राहिला नाही. काही महिने ऑनलाईन शिक्षण घ्यावच लागेल नाहीतर वेळ वाया जाणार आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार हे उघड सत्य आहे.
त्यामुळे जसा आपण 3G मोबाईल सोडून 4G चा मोबाईल वापरतो, Windows XP वरून Windows 10 वापरतोय तसच Office 7 सोडून Office 13 वापरतोय तसच काही महिने तरी आपली मानसिकता बदलून ऑनलाईन शिक्षणाकडे वळण्याशिवाय पर्याय नाही हेच खर...
I've been reflecting a lot lately about my experience as an engineering major in college. I was always worried that I might not be smart enough or that my grades weren't going to be good enough because it took me much longer than other people. Then, when I was getting my diploma after four years, I realized that I didn't have anything to worry about at all! I felt so accomplished but so relieved at the same time knowing that it wasn't going to be as hard as I thought it would be. Thoughts from a cyber-classroom veteran: Online learning can be done well or poorly. Get tips from this infographic if you want to see the potential of online learning courses!
ReplyDeleteAre you reaching out to your target market digitally? We will help you to bring you on top.
ReplyDeleteAs the best Digital Marketing Company in Jalandhar, our aim is to help you grow into a market leader. We deal in SEO, SMO and Paid marketing. Get in touch with us!