Satara (Maharashtra) and Corona






सातारा आणि कोरोना : 
सातारा हे तस पाहिल तर पश्चिम महाराष्ट्र मधील अतिशय शांत शहर, जिल्हा ही. कुठे चीन मधील रोग भारतात आला मग पुण्यात मग मुंबई मध्ये. तेव्हा सातारकरांना वाटले हा रोग आपलेकडे येणे अशक्यच. 

पहिले दोन रुग्ण विदेशी दौरा करुन आलेले त्यातील एक जण इतर व्याधींमूळे पूर्ण बरा होऊन देखील दुर्देवाने मृत्युमुखी पडला तर दुसरा पूर्ण बरा झाला. तेव्हा पासून सातारा हा या रोगापासून किरकोळ सावध झाला.

 मुंबई नाशिक पुणे येथून येणारे बांधवानी जेव्हा प्रामुख्याने जावली कराड या तालुक्यातून धक्के द्यायला सुरवात केली तेव्हा सातारकरांनी डोळे किलकिले करुन या रोगाची पाहणी केली. तो पर्यंत हरी ओम शांति.

 प्रशासन एकिकडे जीवाचं रान करत होते दुसरीकडे सातारकर भाजीपाला, कास सफर, सकाळ रात्रि पाय मोकळे करणे यात मग्न होते. जशी जिल्हा बंदी शिथील झाली आणि मुंबई पुणे कर येवू लागले त्यातील काही जण रोगयुक्त सापडू लागले तेव्हा मात्र शांत सातारकर अशांत झाले. कावरेबावरे झाले.

 आज पावेतो कोणत्याही संकटाला सामोरे न गेलेले किंबहुना तशी परिस्थिति ही निर्माण न झाली नसलेने सातारकर या संकटाला मात्र पूरते घाबरले ... घाबरले का... नाही हो छ्या.... घाबरेल तो सातारकर कसला... जशी दारु खुली झाली तसा घरात थोडासा गुपचूप बसलेला सातारकर खुला झाला च्या मायला त्या कोरोनाच्या मनात चार पाच शिव्या हासडून बाहेर पडला. नंतर हळू हळू सरकारनेही काही अंशी शिथिलता आणली आणि छोटासा सातारा गर्दी ने फुलून गेला.

 रुग्ण वाढत आहेत काही जण वेळेत न आल्याने तसच इतर कठिन व्याधी असल्याने दुर्देवाने मृत्युमुखी पडत आहेत पण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे. सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राच्या निर्णयामूळ सातारकर सुखावला. आजवर सातारा मध्ये सातशे च्या वर रुग्ण आहेत. 

कोरोना केअर सेंटर, सातारा सर्व साधारण रुग्णालय, कराड मधील सह्याद्री हॉस्पिटल तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज यासारखी कोरोना योद्धा केंद्र जीवाच रान करुन कोरोना मुक्तीसाठी अहोरात्र काम करत आहेत. नावाला साजेस काम करत आहेत. सातारा जिल्हा मधील प्रशासन हे निश्चितच सुरुवातीपासूनच अतिशय उत्तम रित्या त्यांची जबाबदारी पार पाडत आहे हे समस्त सातारकराऩी पाहिले आहे. 

त्यांचा गौरव करायचा सोडून शहर नगर पालिका राजकारणात व्यस्त आहे हा भाग वेगळा... सातारकर वेळीच सावध झाल्याने समूह संसर्गापासून ते दूर राहीले हे सातारकरांचे यश मानावे लागेल. 

सध्या रुग्ण वाढीचा वेग मृत्यु दर बरे होणे चे प्रमाण याचा विचार करता बाहेरून  आलेला सातारा  मधील  हा कोरोना हा पाठशिवीचा खेळ खेळत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही

No comments:

Post a Comment