शेळीपालन,कुक्कुटपालन,गीरगाय पालन,दुग्धव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम पंढरपुर

: 💐महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त:💐

@श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ@ आयोजित
















  🐥शेळीपालन,कुक्कुटgपालन,गीरगाय पालन,दुग्धव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम पंढरपुर 

     🛑पंढरपुर येथे 19 ऑक्टो,ते,21आक्टोबर  तीन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम

      वेळ:- सकाळी ११.०० ते 2.००

   स्थळ:-संत गाडगे महाराज मठ स्टेशनरोड पंढरपुर

•       टीप: प्रशिक्षण प्रमाणपत्र व बँक लोन व  सरकारी( गव्हरमेन्ट) स्किम मिळवण्यासाठी उपयुक्त असे महाराष्ट्र शासन मान्य असे सर्टिफिकेट मिळेल

•   प्रवेश शुल्क व अधिक माहितीसाठी   संपर्क:-9011952003,8208404208

  *टिप*  प्रशिक्षणामध्ये सर्वांना एक पुस्तक 180रु,व 7 लाखाचा,प्रोजेक्ट्स रिपोर्ट फ्री मिळेल तसेच शेळीपालन ची pdf फ्री मिळेल,

🚩डॉ साधना उगले मॅडम🚩: कृपा करून हा मेसेज आपल्या सर्व मित्रांना व शेतकरी बांधवांना पाठवावा ही नम्र विनंती


Corona | chicken and eggs

कोरोना कोंबडी आणि अंडी



 मनुष्य प्राणी सारखा स्वार्थी प्राणी या पृथ्वी वर कोणीही नाही.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात कोठून तरी अफवा पसरली की कोरोना कोंबड्यापासून होतो. लोकांनी चिकन खाणं सोडून दिलं. हजारो कोंबड्यांची पिल्ले जिंवत गाडली गेली, कोंबडी ₹१० ला दोन मिळू लागल्या. 

काही ठिकाणी फुकटही कोणी घेत नव्हते. पोल्ट्री व्यावसायिक उघड्यावर पडले, लाखो रुपयांचे नुकसान झाले ते अफवेमूळे. सर्व सामान्य जनता अफवांना किती बळी पडते याचे हे उत्तम उदाहरण होते.

यानंतर काही दिवसांनी लोकांना समजू लागले कोरोना कोंबड्यामूळे होत नाही तेव्हा कुठे कोंबडी खाणं सुुरु झालं.

आता तर काय इम्युनिटी शक्ति वाढवण्यासाठी तसेच कोरोना बाधित रुग्णालाही रोज अंडी दिली जातात, शिवाय चिकनही अतिशय अत्यावश्यक म्हणून खाल्ले जात आहे.

आहे ना कमाल या मनुष्य प्राण्याची.


देशातील लाखो निष्पाप कोंंबड्याचे जीव फुलण्याआधीच माती मोल केले गेले आता गरज म्हणून त्यांच्यावरच अवलंबून राहवं लागत आहे.


खरच या पृथ्वी वर सर्वात स्वार्थी कोण असेल तर तो मनुष्य प्राणी च...!!! 




Three important tools that are essential for online learning

 ऑनलाईन शिक्षण घेताना आपल्या पाल्यांची सुरक्षितता ही सर्वप्रथम गरज यासाठी या उपकरणांचा समावेश जरुर करा.



ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांचा मोबाईल, लॅपटॉप कायम व्यस्त ठवणे पालकांना साहजिकच शक्य नाही. यासाठी पर्याय अनेक आहेत. त्यात लॅपटॉप, कॉम्प्यूटर याही पेक्षा सहज सुलभ अशी पुढील काही उपकरणे मुलांसाठी देता येतील जी आपल्याला खर्चिकदृष्ट्याही परवडणारी आहेत.

1) टॅब : 
   लिनोओ कंपनीचा टॅब फक्त 10,000 मध्ये उपलब्ध आहे. महागडा मोबाईल पेक्षा मुलांना टॅब दिला तर ते त्यांचे ऑनलाईन शिक्षण व्यवस्थित घेवू शकतील. हा टॅब कायम हातात धरुन ठेवावा लागत नसलेने त्यांचा हात ही भरुन येणार नाही. तसेच टॅब हा कोठेही मुलांना जिथे सोईचे वाटेल तिथे ती घेवून जावू शकतात.

अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा लेनोवो टॅब एम 8 एचडी (2 जीबी, 32 जीबी, वायफाय)

लिनोओ कंपनीचा लेनोवो टॅब एम 10 एचडी (2 जीबी, 32 जीबी, वायफाय) हा टॅब देखील ऑनलाईन शिक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो


2) पॉवरबॅंक : ऑनलाईन शिक्षण चालू असलेने वापरात असलेली उपकरणे चार्जिंग करुन ठेवणे गरजेच बनते यामध्ये या उपकरणांचे चार्जिंगही कमी होत राहते यासाठी आपण कायम प्लगमध्ये चार्जिंग पॉइंट घालून बसलो तर या उपकरणांवर तसेच प्लगवरही अधिक भार येवून ती लवकर खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
यासाठी आपण पॉ़वरबॅकचा वापर करु शकतो. पॉवरबॅंक वापरात आणली तर घरातील प्लग वर येणारा अतिरिक्त ताण कमी होईल तसेच सदरची उपकरणे कधीही कुठेही चार्ज करता येतील.

3) हेडफोन : ऑनलाईन शिक्षण घेताना मुलांना मोबाईलचा साधा हेडफोन वापरु देवू नका तर हा या प्रकारचा माईक असलेला हेडफोन वापरा. टॅब, मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉवर साठी साधा हेडफोन सतत वापरावा लागत असल्याने मुलांच्या कानाला तसेच ऐकण्याच्या क्षमतेला प्रॉब्लेम येवू शकतो हा एक ऑनलाईन शिक्षणाचा तोटाही म्हणावा लागेल यासाठी सर्वात महत्वाचा आहे तो चांगला हेडफोन तोही माईक सिस्टीम असलेला
ब्लूटुथ सिस्टीम असलेला डिजीटेक चा डिजीटेक ब्लूटूथ हेडफोन (डीबीएच 006) किंमत फक्त 700 हा हेडफोन देखील एक उत्तम निवड होऊ शकते.


Coronil | Coronavirus medicine kit | stop Criticized


योग गुरु रामदेव बाबा यांना कोरोनिल हे कोरोनायुद्धात शस्त्र म्हणून आणले आणि त्यावर काही जणांचा टिकेचा भडिमार चालू झाला. तस पाहिल तर आपल्या आयुर्वेदात प्रत्येक आजारवर उपाय आहे हे आपल्यालाही चांगलच माहिती आहे. रामदेव बाबा यांनी आयुर्वेदाचा आधार घेऊन भारतीय उत्पादने बाजार आणली तेव्हा पासून भल्या भल्या कंपन्यांच धाब दणाणले आहे. टुथपेस्ट म्हटली की कोलगेटच ही संकल्पना रामदेव बाबा यांच्या दंतकाती मूळे बदलली आणी कोलगेटला आयुर्वेदिक पेस्ट करण्यास भाग पडले. अशी अनेक उदाहरण देत येतील. अनेक परकिय कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत धक्का बसू लागला. आपल्या भारतीय लोकांची मानसिकता अशी आहे की आपण आपल्याच लोकांच ऐकत नाही. रिलायन्सच्या जिओ बाबत असो किंवा सुशांतसिंग चे आत्महत्या प्रकरण असो. आपण विश्वासच ठेवू शकत नाही की आपण काही चांगलही करु शकतो. आपल्याकडे तेवढी क्षमता बुद्धीमत्ता आहे (उगाच नाही भारतीय सुंदर पिचाई गुगल सारख्या कंपनीचा सीईओ झाला). 
रामदेव बाबा यांचे औषधाला काय हरकत आहे पाठिंबा द्यायला हो आपल्याला. अशीही लोक मरत आहेत ते औषध घेवून तर पाहा मरणार तर नाहीतच कारण ते आयुर्वेदिक असणार. 
जर डब्लू एच ओ, अमेरिका, इंग्लड, चीन यासारख्या कंपन्यानी सांगितल तर आपण विश्वास ठेवू कारण काय ते हुशार आणि शिकलेले. भारतीय लोकांचा बाहेरील देशांवर दांडगा विश्वास पण भारतातील लोकांवर तेवढा का नाही. याच भारतीय वृत्तीमुळे ब्रिटीशांना भारतावर 150 वर्षे राज्य करणे सहज शक्य झाले. परकिय देशातील कंपन्यासाठी पायघड्या घातल्या जातात पण देशात एखादा उद्योग उभा राहत असेल तर त्याला लाल फितीत असे काही अडकवले जाते की उद्योगच नको अशी मानसिकता करुन बसतो.
रामदेव बाबा यांचे औषध गोररगरीब जनतेसाठी रामबाण ठरुही शकते. त्याला किमान साथू तरी द्यावी लागेल. नाही चालले तर एक प्रयत्न म्हणून तरी पाहायला काय हरकत नसावी. जशी देशाची अर्थव्यवस्था सुधारावी म्हणून दारु विक्री जर होऊ शकते तर प्रयत्न करणा-याला साथ देणे यात गैर ते काय???

आपल्या भारतीय लोकांच्या कौशल्यावर, बुद्धीमत्तेवर विश्वास ठेवायला शिका जी काय श्रेष्ठच आहे.

Satara (Maharashtra) and Corona






सातारा आणि कोरोना : 
सातारा हे तस पाहिल तर पश्चिम महाराष्ट्र मधील अतिशय शांत शहर, जिल्हा ही. कुठे चीन मधील रोग भारतात आला मग पुण्यात मग मुंबई मध्ये. तेव्हा सातारकरांना वाटले हा रोग आपलेकडे येणे अशक्यच. 

पहिले दोन रुग्ण विदेशी दौरा करुन आलेले त्यातील एक जण इतर व्याधींमूळे पूर्ण बरा होऊन देखील दुर्देवाने मृत्युमुखी पडला तर दुसरा पूर्ण बरा झाला. तेव्हा पासून सातारा हा या रोगापासून किरकोळ सावध झाला.

 मुंबई नाशिक पुणे येथून येणारे बांधवानी जेव्हा प्रामुख्याने जावली कराड या तालुक्यातून धक्के द्यायला सुरवात केली तेव्हा सातारकरांनी डोळे किलकिले करुन या रोगाची पाहणी केली. तो पर्यंत हरी ओम शांति.

 प्रशासन एकिकडे जीवाचं रान करत होते दुसरीकडे सातारकर भाजीपाला, कास सफर, सकाळ रात्रि पाय मोकळे करणे यात मग्न होते. जशी जिल्हा बंदी शिथील झाली आणि मुंबई पुणे कर येवू लागले त्यातील काही जण रोगयुक्त सापडू लागले तेव्हा मात्र शांत सातारकर अशांत झाले. कावरेबावरे झाले.

 आज पावेतो कोणत्याही संकटाला सामोरे न गेलेले किंबहुना तशी परिस्थिति ही निर्माण न झाली नसलेने सातारकर या संकटाला मात्र पूरते घाबरले ... घाबरले का... नाही हो छ्या.... घाबरेल तो सातारकर कसला... जशी दारु खुली झाली तसा घरात थोडासा गुपचूप बसलेला सातारकर खुला झाला च्या मायला त्या कोरोनाच्या मनात चार पाच शिव्या हासडून बाहेर पडला. नंतर हळू हळू सरकारनेही काही अंशी शिथिलता आणली आणि छोटासा सातारा गर्दी ने फुलून गेला.

 रुग्ण वाढत आहेत काही जण वेळेत न आल्याने तसच इतर कठिन व्याधी असल्याने दुर्देवाने मृत्युमुखी पडत आहेत पण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे. सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राच्या निर्णयामूळ सातारकर सुखावला. आजवर सातारा मध्ये सातशे च्या वर रुग्ण आहेत. 

कोरोना केअर सेंटर, सातारा सर्व साधारण रुग्णालय, कराड मधील सह्याद्री हॉस्पिटल तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज यासारखी कोरोना योद्धा केंद्र जीवाच रान करुन कोरोना मुक्तीसाठी अहोरात्र काम करत आहेत. नावाला साजेस काम करत आहेत. सातारा जिल्हा मधील प्रशासन हे निश्चितच सुरुवातीपासूनच अतिशय उत्तम रित्या त्यांची जबाबदारी पार पाडत आहे हे समस्त सातारकराऩी पाहिले आहे. 

त्यांचा गौरव करायचा सोडून शहर नगर पालिका राजकारणात व्यस्त आहे हा भाग वेगळा... सातारकर वेळीच सावध झाल्याने समूह संसर्गापासून ते दूर राहीले हे सातारकरांचे यश मानावे लागेल. 

सध्या रुग्ण वाढीचा वेग मृत्यु दर बरे होणे चे प्रमाण याचा विचार करता बाहेरून  आलेला सातारा  मधील  हा कोरोना हा पाठशिवीचा खेळ खेळत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही

Rajwada Chaupati Satara | Corona Virus Situation

मी राजवाडा सातारा चौपाटी 

Rajwada Satara

जवळ जवळ 60 दिवस होत आले मी बंद आहे. पूर्ण शांत... एकटी... गोंगाट नाही, बच्चे कंपनीचा फुग्यांसाठी हट्ट नाही की खेळण्यासाठी मागणी नाही. सुपनेकरांचा  दही भर... पैसे सुट्टेच द्या... हात वर करा... असा प्रेमळ ओरडा नाही, चायनीज च्या मालकांचा या या हा आवजही नाही की आईस्क्रिमसाठी भैय्यांची हाकही ऐकू नाहीये. पाणीपुरी साठी ती लगबगही नाही. सातारची प्रसिद्ध कुल्फी ही कोणी मागत नाही.... रात्र तर मला खायाला उठते... तुम्हीच मला गर्दीची सवय लावली आहे. आता हे एकाकी दिवस मला सहन होण्याच्या पलिकडे गेले आहेत.
 
आठवतय तुम्हाला.... !!!

चौपाटीची सकाळ मस्त आणी स्वस्त अशा पुरीभाजीने होते जी अनेक गोरगरीब सातारकर खावून आपली न्याहरी करत असतात. दहा अकरा झाले की सातारकरांची वडापाव वर झुंबड उडते. त्यातल्या त्यात बंडू वडापाव तर विचारुच नका वेळेची पर्वा न करता गरमागरम वडापाव बटाटा भजी खावून घेऊनच धन्य मानले जाणारे सातारकर...

काही परप्रातीयांच्या आईस्क्रिमच्या गाड्या जेथे अगदी पाच 5 रुपयांपासून आजही आईस्किम मिळते, तो मिल्कशेक, फालूदा हेही परवडणा-या किंमतीतच. तसचं पाणीपुरी, भेलपुरीही...
अजिंक्य भेळ तर चौपाटीची प्रसिद्ध भेळ तीचे प्रकारही अनेक. चौपाटीवर मिळणारे गरमागरम मसाला दूधही प्रसिद्धच. सुपनेकरांचे विविध पदार्थांसाठी तर रांगा लागलेल्या (वडा चटणी, पॅटीस, शाबूवडा, दहीवडा, मिसळ)
सायंकाळी तर चौपाटीला रोज यात्रेचे स्वरुप
चायनीज काय कच्छी दाबेली, अनेकाविध खाद्यपदार्थांची मांदयाळीच
त्याच बरोबर छोट्या बच्चे कंपनीसाठी खेळणीही 
चौपाटी रोज कितीतरी सातारकरांचे जिभेचे चोचले पूर्ण करते... तसचं अनेकांचा रोजचा व्यवसायही...
अनेक कुटूंब ही चौपाटीवर काम करुन उदरनिर्वाह करत असतात. 
हे सर्व कोरोनाच्या जागतिक संकंटामुळे एकाकी बंद झाले जवळ जवळ साठ 60 झाले असतील अजून किती दिवस चौपाटी बंद राहिल हे ही माहिती नाही.
चौपाटीच्या रोजच्या उत्पन्नातून उदरनिर्वाह करणारे सध्या कुठे असतील कसे असतील काय करत असतील याची काळजी आहेच...
हे ही दिवस जातील नक्कीच... पुन्हा चौपाटी सातारकांनी भरुन जाईंल पण होणारे नुकसान भरुन निघणार नाही.
आईस्क्रिमचे गाडे, पाणी पूरी चे ठेले, कच्छी दाबली यांचे ठेले चालविणारे कदाचित परप्रातिंय सातारा मधून गेलेही असतील... ते परत नाही आले तर सातारकांनी त्यांची उणिव भासू देवू नये.

या काळात सर्वांनी काळजी घ्या लवकर विजयी व्हा ... !!! 
कोरोना हरेलच... 

मी तुमची वाट पाहत आहे...
राजवाडा चौपाटी सातारा...

Marathi Information | Essential Services Registration Form | Covid19 ePass

आपल्या परिवारास आपले राहते गावी सोडण्याकरीता किंवा आणणेकरीता परवानगी अर्ज करताना आवश्यक माहिती मराठीतून


नवीन पाससाठी अर्ज 

  • अर्ज इंग्रजीमध्येच भरावा
  • सर्व व्यासपीठ सेवा प्रदाता / व्यक्ती या प्लॅटफॉर्ममधून ट्रॅव्हल पाससाठी अर्ज करू शकतात
  • सर्व तपशील योग्यरित्या भरा आणि सबमिटवर क्लिक करा
  • अपलोड करताना सर्व संबंधित कागदपत्रे एका फाइलमध्ये एकत्र करा
  • अर्ज सबमिट केल्यानंतर, आपल्याला एक टोकन आयडी मिळेल. ते जतन करा आणि आपल्या अनुप्रयोगाची स्थिती तपासण्यासाठी त्याचा वापर करा
  • संबंधित विभागाकडून पडताळणी व मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करू शकता
  • ई-पासमध्ये आपले तपशील, वाहन क्रमांक, वैधता आणि एक क्यूआर कोड असेल.
  • प्रवास करताना आपल्याकडे एक मऊ / हार्ड कॉपी ठेवा आणि पोलिसांना विचारले असता ते दर्शवा
  • वैध तारखेनंतर किंवा अधिकृतताशिवाय कॉपी करणे, त्याचा दुरुपयोग करणे किंवा त्याचा वापर करणे हा दंडनीय गुन्हा आहे
  • फोटोचा आकार 200 केबीपेक्षा जास्त नसावा आणि संबंधित दस्तऐवजाचा आकार 1 एमबीपेक्षा जास्त नसावा.
(फोटो, दस्तऐवजांचा आकार बदलण्यासाठी पुढील मोबाईल ऐप्लिकेशन वापरु शकता) 
Photo Reduce Apps


Apply for Travel E-Pass

हे ही वाचा कोरोना मराठी शब्दसंग्रह

Marathi Vocabulary | Coronavirus COVID-19

कोरोना  इंग्रजी शब्दांना मराठीत नक्की काय म्हटले जाते विषयीचा हा छोटासा प्रयत्न ज्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल.
या संकटाच्या वेळी, त्यातील शब्दावली जाणून घेणे आणि समजून घेणे या गोष्टींमुळे होणारी भीती काही प्रमाणात कमी करण्यास मदत करेल....

asymptomatic रोगविरोधी
community spread समुदायात प्रसार
carrier वाहक
contact tracing संपर्क शोधणे
contagious सांसर्गिक
coronavirus कोरोनाविषाणू
COVID-19 कोविड 19
diagnose रोगाचे निदान करणे
diagnosis रोगचिकित्सा
disease आजार
droplets बिंदुके
epidemic साथरोग
herd immunity कळप रोग प्रतिकारशक्ती
incubation रोगजंतूंनी शरीरात प्रवेश मिळविल्यानंतर प्रत्यक्ष रोगाय आरंभ होईपर्यंत काळ
incubation period उद्भावन कालावधी
infect संसर्ग
infected संसर्गित
infectious संसर्गजन्य
isolate अलग ठेवणे
isolation अलगीकरण
mask मुखवटा
novel coronavirus नवीन कोरोनाविषाणू
outbreak उद्रेक
pandemic (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला
pathogen रोगकारक
patient zero रुग्ण शून्य
PCR test पीसीआर चाचणी
PCR = polymerase chain reaction पीसीआर - पॉलिमरेझ साखळी प्रतिक्रिया
PPE personal protective equipment वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे
person-to-person व्यक्ती ते व्यक्ती
quarantine विलग्नवास
SARS-CoV-2 सार्स-कोव -2
screening प्रतिदीप्त पडद्यावर केलेली तपासणी
self-isolate स्वत: ला अलग ठेवणे
social distancing सामाजिक अंतर
superspreader सुपरस्प्रेडर
symptomatic रोगसूचक
symptoms लक्षणे
test negative | test positive चाचणी नकारात्मक | सकारात्मक चाचणी
transmission संसर्ग
transmit प्रसारित करणे
treat उपचार
treatment उपचार
vaccine लस
viral रोग विषाने झालेला
virus विषाणू
zoonotic झोनोटिक

How to use Aarogya Setu App in Marathi

Cover artआरोग्य सेतू अ‍ॅप कसे वापरावे आणि आपल्यास कोरोनव्हायरसची लक्षणे आहेत का हे कसे शोधावे 

याविषयी महत्वपूर्ण माहिती
सहज सुलभ मराठीत...
आरोग्य सेतु हे मोबाइल अ‍ॅप  इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेले आहे. हे भारतीतल विविध 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे. याची एकंदर साईज 2.8 एम. बी. अशी आहे. हे पूर्णपणे मोफत वापरता येणारे अ‍ॅप आहे. 

आरोग्य सेतू अ‍ॅप गुगल प्ले आणि Apple  अ‍ॅप स्टोअर या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.  वापरकर्त्याने पॉझिटिव्ह चाचणी घेतलेल्या एखाद्या व्यक्तीबरोबर मार्ग पार केल्याची माहिती ठेवण्यासाठी हे डिझाइन केले गेले आहे. ट्रॅकिंग ब्लूटूथ आणि स्थान-व्युत्पन्न सामाजिक आलेखाद्वारे केले जाते, जे सकारात्मक चाचणी घेत असलेल्या कोणाशीही आपला संवाद दर्शवू शकते.

अ‍ॅप स्थापित (इंस्टॉल) केल्यानंतर, आपल्याला ब्लूटुथ (आपल्याला ते नेहमीच चालू ठेवण्याची शिफारस केली जाते) आणि स्थान चालू करावे लागेल. नंतर 'स्थान सामायिकरण' (लोकेशन शेयर) 'नेहमी' वर सेट करा (आपण हे नंतर कधीही बदलू शकता).

त्यात स्वत: ची चाचणी करण्याचे एक साधन आहे. वापरकर्त्यास बर्‍याच प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले जाते. काही उत्तरे कोविड लक्षणे दर्शविल्यास, ही माहिती सरकारी सर्व्हरला पाठविली जाईल. आवश्यक असल्यास आवश्यकतेनुसार डेटा वेळेवर पावले उचलण्यास आणि अलगाव प्रक्रिया सुरू करण्यास सरकारला मदत करेल.


आपण एखाद्याच्या नकळत  सकारात्मक चाचणी घेतल्याच्या व्यक्तीच्या जवळपास आला तर आपल्याला सतर्क केले जाईल. आपोआप अलगाव कसे करावे आणि लक्षणे विकसित झाल्यास काय करावे याबद्दलच्या सूचनांसह अ‍ॅप अ‍ॅलर्टचा समावेश आहे.

हा डेटा फक्त सरकारलाच सामायिक (शेयर) केला जातो.  आपले नाव आणि नंबर सार्वजनिकपणे उघड करण्यास परवानगी देत नाही.


अ‍ॅप वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना अशा आहेतः

1. आपण अ‍ॅप इंस्टॉल केले नंतर तर, सूचित केल्यानुसार त्यास आपल्या डिव्हाइसच्या स्थानात प्रवेश करण्याची परवानगी द्या.
२. आपणास एक ओटीपी मिळेल, तो प्रविष्ट करा आणि आपण चालू आहात.
3. दिलेल्या पर्यायांमधून आपले लिंग निवडा.
4. जसे सांगितले तसे आपले पूर्ण नाव, वय आणि नंतर व्यवसाय प्रविष्ट करा.
5. आपणास गेल्या 30 दिवसात आपल्या परदेशी प्रवासाच्या इतिहासाबद्दल विचारले जाईल. योग्य उत्तर द्या. आयसीएमआर डेटाबेसच्या मदतीने तुमचा परदेशी प्रवास इतिहास, जर असेल तर, ज्यांनी सकारात्मक चाचणी केली आहे त्यांच्याशी जुळेल.

 अॅप आपल्याला आवश्यक वेळी स्वयंसेवा (चाचणी) करण्यास तयार आहे की नाही याबद्दल विचारतो. आपण उत्तर दिले असे मानल्यास होय, 20-सेकंद मूल्यांकन चाचणी प्रारंभ होते.

आपण आपल्या फोनवर आरोग्य सेतू स्थापित केल्यानंतर, तो जवळपासचे इतर स्मार्टफोन शोधून काढेल ज्यामध्ये अॅप देखील स्थापित केलेला आहे. यानंतर यापैकी कोणत्याही संपर्काची सकारात्मक चाचणी केल्यास ते परिष्कृत मापदंडांवर आधारित संसर्गाचा धोका शोधू शकतात.



अ‍ॅप स्टोअर लिंक : आरोग्य सेतु डाऊनलोड लिंक

Also, visit:

My Gov Corona Help Desk



6 Best Tips to Recognize Fake News

It's now easier to identify fake news on Facebook, WhatsApp, and other social media. Let's find out how viral messages, news, photos, and videos are faked or true.

Use Google Search Engine

Get Google's help in understanding whether viral messages, news, photos, and videos are real or false. Find information by searching on Google.

URL

If a news message comes to you, first check its URL. The news from the link is true or false. Spellings are often incorrect in links.

Headlines

Check out viral news or video headlines on social media. False news headlines often have mistakes. There are mistakes as well in headlines.

Source

There are numerous things that are constantly shared on Facebook, WhatsApp. But its source is very important. From this one can verify the truth of the news.

Date

Many things that go viral on social media are often outdated. This is sometimes encountered in fact checks. So if you want to check the news, check its date.

The authenticity of a photo

Editing a photo is now easy. So check the photos in the viral thing first. Look closely at it. Photos are mainly used in fake news. You can use online authenticity photo checking tools i.e. Geofeedia, Wikimapia, JPEGSnoop, Google Search by Image 

6 Tips to Recognize Fake News

6 Tips to Recognize Fake News 

 बनावट बातम्या ओळखण्यासाठी 6 टीपा


फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडियावर आलेल्या फेक न्यूज ओळखणं आता सोपं झालं आहे. व्हायरल मेसेज, बातम्या, फोटो आणि व्हिडिओ फेक आहेत की खरे आहेत हे कसं ओळखायचं जाणून घेऊया

Google शोध इंजिन वापरा
व्हायरल संदेश, बातमी, फोटो आणि व्हिडिओ वास्तविक आहेत की खोटे आहेत हे समजून घेण्यासाठी Google ची मदत मिळवा. गुगलवर शोधून माहिती शोधा.

URL
आपल्याकडे एखादा न्यूज संदेश आला तर प्रथम त्याची URL तपासा. दुव्यावरील बातमी सत्य की खोटी आहे. दुवे मध्ये शब्दलेखन सहसा चुकीचे असते.

मथळे (Headlines)
सोशल मीडियावर व्हायरल बातम्या किंवा व्हिडिओ मथळे पहा. चुकीच्या बातम्यांच्या मथळ्यामध्ये बर्‍याचदा चुका होतात. मथळ्यांतही चुका असतात.

स्त्रोत (Source)
फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर सतत ब-याच गोष्टी सामायिक केल्या जातात. पण त्याचा स्रोत खूप महत्वाचा आहे. यावरून एखादी बातमी सत्य सत्यापित करू शकते.

तारीख
सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या बर्‍याच गोष्टी बर्‍याचदा जुन्या असतात. हे कधीकधी वस्तुस्थिती तपासणीमध्ये आढळते. म्हणून जर आपल्याला बातम्यांची तपासणी करायची असेल तर त्याची तारीख तपासा.

फोटोची सत्यता
फोटो संपादित करणे आता सोपे आहे. तर व्हायरल गोष्टीतले फोटो आधी तपासा. त्याकडे बारकाईने पहा. फोटो प्रामुख्याने बनावट बातम्यांमध्ये वापरतात. आपण ऑनलाइन सत्यता फोटो तपासणी साधने वापरू शकता म्हणजेच जिओफिडिया, विकिमापिया, जेपीईजीस्नूप, प्रतिमेनुसार Google शोध


mahainfocorona | Corona topic related website by Government of Maharashtra

महाराष्ट्र शासनाने कोरोना विषयक अद्ययावत माहिती देणे साठी महाइन्फोकोरोनाडॉटइन ही वेबसाईट नुकतीच लॉंच केली आहे.


या वेबसाईटमध्ये महाराष्ट्रातील कोरोनाबाबतचे अद्ययावत अपडेट पाहावयास मिळतात.

वेबसाईटच्या होम पेजवर अनेक उपयुक्त माहिती प्रकाशीत करण्यात आली आहे.

लाईव्ह अपडेटस् सोबतच 
महाराष्ट्र सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसोबतच रात्रनिवारे, भोजनालये अशा विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत याची माहिती, Twitter अपटेडस् सेक्शनही आहे.
ठळक वैशिषट्ये
लाईव्ह चार्ट या चार्टवर माऊस पॉइंटर नेल्यास कोणत्या ठिकाणी किती कोरोना रुग्ण आहेत याची माहीती मिळते. सोबत लाईव्ह पाय चार्टही अद्ययावत माहिती देतो.

तसेच मुख्यमंत्री सहायता निधी चा बारकोडही यावेबसाईटवर दिलेला आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईतील ठळक बातम्याही होमपेजवर पाहावयास मिळतात.

मुख्य मेनू टॅब्स

 कोविड 19 - सर्वसाधारण माहिती यामध्ये कोरोनाबाबतच्या
1) खबरदारी 2) विलगीकरण 3) शंकासमाधान यांची माहीती दिली गेली आहे.

हेल्पलाईन या वेबपेज वर महाराष्ट्रातील कोकण विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग , औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग ,नागपूर विभाग या विविध विभागातील जिल्हास्तरीय हेल्पलाईन नंबर दिले गेले आहेत.

सार्वजनिक सुविधा (सर्वात महत्वाचे)
या वेबपेजवर जिल्हा तालुका स्तरावरील सामान्य शासकीय रुग्णालय, महापालिका रुग्णालय, वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालय, खाजगी / अधिगृहीय रुग्णालय, शिवभोजन केंद्र, निवास व्यवस्था, रेशन/स्वस्त धान्य दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विविध सामाजिक संस्था यांची नाव, फोन नंबर, पत्ता, त्या देत असलेल्या सुविधा यांची माहिती पाहवयास मिळते.

ठळक घडामोडी मध्ये अपडेटस् झालेल्या ठळक घडामोडी आपणास पाहवयास मिळतात.

सोशल मिडीया, व्हॉटस्अप वरील बहुतांश माहिती ही विसंगत किंवा फेक असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. 
तरी आपण सर्वांनी या महाइन्फोकोरोनाडॉटइन वेबसाईटाचा वापर करुन कोरोना बाबतची अधिकृत माहिती जाणून घेऊ शकतो. 

ही वेबसाईट पूर्णपणे मराठी भाषेत असल्याने ती समजण्यासही सहज सोपी आहे. या वेबसाईटचा आपण आपल्या मोबाईलमध्ये Add to Destop करुन ठेवावा म्हणजे ती सहजपणे उघडता येईल.

वेबसाईट लिंक: https://mahainfocorona.in/mr

Aarogya Setu App | आरोग्य सेतु ॲप



Cover art

Aarogya Setu app

कोरोना व्हायरस चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत सरकार कडून एक ॲप तयार करण्यात आले आहे. ‘आरोग्य सेतू’ असे या ॲप चे नाव आहे. 

आपल्यातील कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर किंवा (साथीचा रोग)) साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यात मदत करण्याची शक्ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे.


कोविड-19 पॉझिटिव्ह चाचणी घेतलेल्या एखाद्या व्यक्तीबरोबर जर आपण रस्ता ओलंडला असेल तर आपल्याला माहिती ठेवण्यास आवडेल काय

आरोग्य सेतु आपल्या ब्लुटूथ आणि स्थानाद्वारे कोव्हिड-19 पॉझिटिव्ह चाचणी घेऊ शकणा-या एखाद्या व्यक्ती बरोबर सामाजिक आलेखाद्वारे आपला संवाद ट्रॅक करतो.

करावयाच्या बाबी

1) आरोग्य सेतु ॲप गुगल प्ले-स्टोअरमधून आपल्या मोबाईलमध्ये इंस्ट़ॉल करा

2) ब्लुटूथ आणि लोकेशन चालू करा

3) लोकेशन सामायिकरण नेहमी वर सेट करा

4) आपल्या डिव्हाईसच्या दुस-या मोबाइल डिव्हाइसच्या जवळपासचे परीक्षण करते, आपण हे नेहमीच चालू ठेवावे.

आपल्या मित्रांना आणि कुटूंबालाही हे ॲप इंस्टॉल करण्साठी आमंत्रित करा.

ॲपची वैशिष्ट्ये -

आपण कोविड-19 पॉझिटिव्हची चाचणी घेतल्या आपण नकळत, अगदी जवळ आल्यास आपल्याला सतर्क केले जाईल

ॲप अलर्टद्वारे विलगिकरण विषयी सुचना आणि जर लक्षणे उत्पन्न झाल्यास काय करावे याविषयी मदत आणि माहिती यामध्ये आहे.

टीप - आपला डेटा फक्त भारत सरकारबरोबर सामायिक केला जातो.
(सदरची माहिती आरोग्य सेतु या ॲप मधून घेण्यात आली आहे)


My-Gov Corona Help-desk | Prepare Don't Panic



This WhatsApp Chatbot has been renamed as MyGov Corona Helpdesk and will be available to all users. All you have to do is save this number in the contact.

While rumors about Corona are raining on social media, the central government has taken steps to provide accurate information.



WhatsApp is widely used to spread rumors on social media. Due to this, the central government has activated the chatbot on this platform. This way you can get answers by asking questions


This step has been taken to prevent Corona rumors, and how can the Coronavirus spread? There are answers to questions like how to reduce its infection.

The chatbot will then send you the question. It has the answers A, B, C, D. Because chatbots are robotic software, they do not understand your language.
This will allow the chatbot to send replies to a letter option that he or she understands. In each message, you will be given a helpline number, email and a link to the YouTube video.


MYGOV CORONA HELPDESK No. 

+91 9013151515 

24x7 Medical Help :

Phone : +91-11-23978046

Toll Free Numer : 1075

Email : ncov2019@gov.in

The Historical Samadhi's at Sangam Mahuli, Satara Maharashtra


सातारा ही मराठ्यांची चौथी राजधानी म्हणून ओळखली जाते. औरंगजेबाच्या मृत्युनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचे राजपुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा ही मराठा साम्राज्याची चौथी राजधानी म्हणून घोषीत केली. त्यांनी सातारा शहराची निर्मिती केली. सातारा शहर हे आजही कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून दूर आहे हे छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीनुसार स्थापन झालेल्या सातारा शहराच्या रचनेमुळेच. 
पेवश्यांना मराठा साम्राज्याची सुत्रे साताराच्या राजधानीनेच बहाल केली होती. 
संगम माहूली गाव तसे सातारा शहरापासून काही किलोमीटर अंतरावर कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. याच ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे नदीच्या काठी आहेत. या समाध्या तशा नदीच्या काठावर आहेत. 


दुर्देवाची बाब ही की या समाध्यांची आजतागाय म्हणजे सन 2020 पर्यंत या समाधी स्थळाकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. ही खर तर अक्षम चूक म्हणावी लागेल. 
छत्रपती राजाराम महाराज भोसले यांच्या पत्नी महाराणी ताराबाई भोसले छत्रपती या अत्यंत शूर, लढवय्या महाराणी. औरंगजेबास शेवटपर्यंत त्राही त्राही करुन सोडणा-या, मराठा साम्राज्य वाढवणा-या महाराणी ताराबाई होत.
"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी | ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली || ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते|”
या शब्दात महाराणी ताराबाई यांचे वर्णन केले जाते.
छत्रपती शाहू महाराज तसेच छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या समाध्यांचा कधी जिर्णोद्धार होणार याचे उत्तर कोणीही शोधत नाही हे मोठे दुर्देव मानले गेले पाहिजे. 

छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय घोषणा देऊन उपयोग आहे का याचा विचार आजच्या तरुण मावळ्यांनी करणे आवश्यक आहे. बलिदान मास पाळतात खूप छान आहे, गड परिक्रमा करतात हेही सुरेख आहे. मात्र छत्रपती घराण्याच्या या समाध्यांकडे पूर्ण दुर्लक्ष ही खंत...
संगम माहूली ग्रामपंचायत, सातारा नगरपालिका, शासन यांनी आजपर्यंत काहाही ठोस पाऊले न उचलल्यामुळे या थोर विभूतींच्या समाध्या आजही जिर्णोद्धाराची वाट पाहत उन वारा पाऊस झेलत आहेत. साताराच्या ही प्रेरणादायक स्थळे कधी पुढे येऊन जिल्हापातळीवर, राज्यपातळीवर, देशपातळीवर येऊन त्यांची महती जगापुढे जाणार हे एक न उगमलेले कोडेच आहे...

The war against Aurangzeb on the fort Ajinkyatara, Satara Maharashtra




किल्ले अजिंक्यतारावरील औरंगजेबा विरुद्ध घनघोर युद्ध



किल्ले विशाळगडावर औरंगजेबाच्या सैन्याची प्रचंड दानादान उडाली. महापूरात त्याची प्रचंड हानी झाली. त्याच्या सैन्याचे धैर्य केव्हाच खचले होते. घोडे, हत्ती, सैन्य, संपत्ती पाण्यात वाहून गेली होती. उरलेले सैन्य सोबत घेऊन त्याची स्वारी क-हाडच्या दिशेने निघाली, खरतर त्याला पुन्हा पन्हाळगडावर जायचे होते. पण त्याच्या डोक्यात मराठ्यांची राजधानीला संपवायचेच ही वेडी अतिमहत्वकांक्षा त्याल शांत बसू देत नव्हती. सकाळच्या प्रहरीच मुघली फौजांचा मोर्चा साताराच्या दिशेने वळला. मराठ्यांची राजधानी सातारा !............. 

सांयकाळच्या सुमारास साताराच्या उत्तरेस असलेल्या करंजे गावामध्ये औरंगजेबाची  स्वारी थांबली. समोर होता किल्ले अजिंक्यतारा. त्याचे डोळे चमकले ... चेह-यावर स्मितहास्य आले... अरे हा तर आपण एका दिवसात घेऊ शकतो हा गड घेतला की मराठा साम्राज्य संपले या विचाराने तो मनोमन आनंदी झाला. मरगळेल्या फौजांना तयार राहण्याचे आदेश दिले. लगचेच तोफांचा मारा सुरु केला. 

मुळातच किल्ले अजिंक्यताराची रचना एवढी कठीण होती ती त्याच्या तोफांचा मारा किल्ल्याला लागूच पडत नव्हता. पण किल्यावरून होणारा तोफांचा मारा त्याचे सैन्य सहज टिपत होता. त्याने गडास वेढा घातला गड पार करुन जाणे सहज शक्य नव्हते हे त्याला 700 ते 800 सैन्य गमावल्यानंतर समजले. गडावर कोणत्याही बाजूने चढाई करुन जाणे अशक्यप्राय गोष्ट होती. 

मराठा सरदार आणि मावळे हे काय चीज आहेत हे त्याने आजवरच्या अनुभवातून जाणले होते. 

एका दिवसाच काम त्याला आता कठिण वाटू लागले. पंधरा वीस दिवस तोफांचा मारा करुन काहीही हातास लागत नव्हते. किल्ल्यावरुन मात्र तोफांचा चौफेर मारा त्याचे सैन्य करु शकत नव्हते. तो मागे हटला. काही दिवस शांत बसला. या कालावधीत गडावरील मावळ्यांना तयारीसाठी पुन्हा वेळ मिळाला.

आजुबाजूच्या परिसातील मोठाली वृक्षे तोडून लाकडांचा दमदमा उभारण्यास मुघली फौजांनी सुरुवात केली. त्यावेळी किल्ले अजिंक्यताराचा परिसर बहुतांश जंगलानेच व्यापला होता. फौजेने जवळपासची बहुतांश वृक्षे तोडून जवळपास गडाच्या उंचीचा लाकडांचा दमदमा उभा केला. या कालाधी गडावरील एक तोफगोळा सरळ औरंगजेबाच्या पुढ्यात येऊन पडला होता. तो जर उडाला असला तर औरंगजेब तिथेच ठार झाला असता. या प्रकारमुळे तोही गांगारुन गेला, तोफेचा गोळा हाताने उचलून शहजादा आझम यांस बोलला मराठ्यांचे तोफगोळे आपल्या पेक्षाही चांगले आहेत, असे तोफगोळे आपल्याला हवेत. शहजादा आझम आणि सभोवतालच्या सैन्याची या प्रकारामुळे गाळण उडाली होती.

दमदम्यावर तोफा चढवल्या गेल्या आणि तब्बल दोन महिन्यांनी पुन्हा मुघली फौजांकडून पुन्हा तोफमारा सुरु झाला. तरीही गोळे आत पडत नव्हते. दीड दोन महिने उलटले वेढ्याचे काम चालूच होते.
खब-यांकडून बातमी काढून मंगळाईचा बुरुज उडवून किल्ल्यात प्रवेश करायचा पक्के झाले. मंगळाईचा बुरुज गडावर विजय मिळवून देणारा होता हे मनोमन पटल्यानंतर हताश झाल्या औरंगजेबाने आणखी केली. सर्व सैन्याला तयार राहण्याची ताकीद दिली. गडावर ही खबर मिळाली. मुघल सैन्य आत येताच त्याला कापून काढायची तयारी त्यावेळचा किल्लेदार प्रयागजी प्रभू यांनी केली.
तो दिवस आला. एका बाजूला गडाच्या आत जाण्यासाठी दबा धरून बसलेले मुघली सैन्य दुस-या बाजूला त्या सैन्याला कापून काढण्यासाठी सज्ज झालेले मावळे. दोघेही तयारीत. तोफेचा गोळा उडाला बुरूजावर जाऊन फुटला मुघली सैन्याला प्रचंड आनंद झाला. पण...
उडालेला भला मोठा दगडांचा बुरूज किल्ल्याच्या आत न पडता आत जाण्यासाठी आतुर झालेल्या मुघली सैन्यावर यमदुताप्रमाणे पडला. पाहता पाहता किल्ल्याची कोसळलेली तटबंदी हजारो मुघली सैन्याच्या अंगावर पडली. होत्याचे नव्हते झाले. हजारो सैन्य त्या दगडांच्या खाली गाडले गेले. तसेच येणा-या सैन्याला कापून काढण्यासाठी सज्ज झालेल्या मावळ्यांचेही नुकसान झाले.
ढिगा-यातून कोणाला बाहेर काढायचे कोण मुघल कोण मावळा हेही समजणे अशक्य झाले. तशाच उभा केलेल्या प्रचंड लाकडांच्या दमदम्यास आग लावली गेली कारण मृत्युमुखी पडलेल्या सैन्याची विल्हेवाट लावणे एवढे सोपे नव्हते.
इकडे औरंगझेबाच्या चर्येवर तीव्र निराशा उमटली. संध्याकाळी खाली मान घालून तो आपल्या करंज्याच्या छावणीत दाखल झाला. राञसुद्धा औरंगझेबाला वैरी झाली होती. आठ दिवस साता-याच्या किल्ल्यावरच्या उतारावरची ती आग भडकत होती. आपल्या छावणीत निमूटपणे बसून औरंगझेब ती आग पाहत होता. या शिवाय त्याच्याकडे काहीच पर्याय नव्हता. किल्ल्यावरील मावळेही हाताश झाले होते आगच एवढी प्रचंड होती. दोन्हीकडील सैन्याचे प्रचंड नुकसान झाले. गेली चार महिने कोणाचीही मदत न घेता गडावरील मावळे औरंगजेबाचा मुकाबला करीत होते. त्याला चांगलेच जेरीस आणले. शेवटी गडावरील रसद कमी पडली. तोफगोळे रिकामे झाले. अनेक मावळे गमावले, जायबंदी झाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने पेटलेली ज्योत मावळ्याच्या रक्तात भिनलेली होती.
आग पूर्ण शांत झाल्या नंतर अगदी म्हसवे गावापासून त्याने पुन्हा तोफांचा मारा सुरु केला. मारा करत करत किल्याजवळ आला. तटबंदी पडल्यामुळे किल्ल्यात प्रवेश करणे शक्य झाले... मरण जवळ आलेल्या औरंगजेबास अजिंक्यातारा तब्बल चार पाच महिन्यांनी जिंकता आला.
अशी अजिंक्यताराची औरंगजेबास जेरीस आणणारी लढाई...!!!
धन्य ते मावळे आणि किल्लेदार...

छत्रपती शिवाजी महाराज की जय !!! हर हर महादेव...

5 Essential Information Related to the Corona Virus




कोरोना व्हायरस संबंधात निगडीत असणारी 5 आवश्यक माहितीमय बाबी




1) चिकन / मटन खाल्ल्याने कोरोना आजार होतो काय...

भारतीय खाद्य संस्कृती श्रेष्ठ आहे. भारतात प्रत्येक अन्न हे पूर्ण शिजवल्यानंतरच खाल्ले जाते. अर्धवट कच्चे अन्न भारतात सहसा कोणी खात नाही. भारतात असणा-या कोंबड्या, शेळी यांना कोरोना आजार झालेला नाही, त्यामुळे चिकन/मटन खाल्ल्याने कोरोना होतो हे साफ चूक आहे. हा मांसाहार जास्त आणि पूर्ण 90 ते 100 अंश सेल्सिअसला उकळून चांगला खाणे उत्तम.

2) पाळीव प्राण्यांहून कोरोनाचा धोका आहे काय...

आता पर्यंत असे आढळलेले नाही की पाळीव जनावरांमुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढतो. तरी जनावरांना हात लावल्यावर साबणाने स्वच्छ हात धुणे आवश्यक आहे.

3) मास्क वापरलेच पाहिजे का...

कोरोना संक्रमित रुग्णांसोबत काम करणारे हेल्थ केअर वर्कसला N95 मास्क घालणे आवश्यक आहे. सामान्य लोक ज्यांच्याकडे असे कोणतेही लक्षण नाही त्यांना कोणत्याही मास्कची तशी आवश्यकता नाही. तरी जर आपण सामान्य मास्क घालत असाल तर आपल्या आरोग्यासाठी लाभदायकच ठरु शकेल.

4) सॅनिटायझर वापरलेच पाहिजे काय...

सॅनिटायझरमध्ये स्पिरीट असते जे उडून जाते, त्याने तळहात कोरडे होतात. सॅनिटायझरचा वापर सामान्य लोक प्रवासामध्ये मुख्यत: करताना दिसून येतात. रोजच सॅनिटायझर अनेक वेळा वापरणे हेही त्वचेसाठी अयोग्य ठरु शकते. हॅण्डग्लोजचा वापर करणे हाही पर्याय असू शकतो.

5) हात कधी धूवावेत...

बाहेरून घरी आल्यावर तसेच ऑफिसमध्ये पोहचल्यावर मुख्यत्वे हात पाय स्वच्छ धुणे आवश्यक आहेच (ही सवय ग्रामीण भागात आहेच). तसेच अंगातील कपडे बदलणे, कपडे रोज धूणे, बाहेरून आल्यावर कपडे बाजूला काढून ठेवणे, चपला, बूट तसेच वाहने पाण्याने धूणे याही गोष्टी होणे गरजेचे आहे.

आपण स्वच्छ राहूच पण त्याच बरोबर आपण राहत असलेला परिसरही स्वच्छ ठेवणे तेवढेच आवश्यक आहे. स्वच्छता वसा घेतला तर कोरोनाच काय कोणताच आजार फार काळ तग धरु शकणार नाही

Satara Kandi Pedha History in Marathi

सातारी पे़ढ्यांची गोष्ट

सातारच्या पेढ्यांना "कंदी पेढे" असंच का म्हणतात?

pedheSatara

गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची. भारतात ब्रिटीश राजवट सुरु होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटीश रिजंट बसवण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.

सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्याकाळात शेतीचं प्रमाण कमी होतं. लोकांच उपजीविकेचं साधन मुख्यसाधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी म्हैशीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं.
हे दुध जवळच मोठं शहर म्हणून सातारला पाठवून दिलं जायचं.

काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटीशांना ही मिठाई प्रचंड आवडली.
त्यांना "करंडी" म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला "कँडी" म्हणायला सुरवात केली. पुढे याच कँडीचं आपल्या सातारकरांनी "कंदी" केलं.
साधारण याच काळात छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबाना साताऱ्यात आणून वसवलं होतं. त्यांनी बनवलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच लाटकर अस ओळखलं जाऊ लागलं.

कंदी पेढ्याला सातासमुद्रापार नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी.
त्यांनी सत्तर वर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहचला.
आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊनदेखील मोदी आणि लाटकर हलवाई  मात्र  कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊपणा वाढतो.
म्हणूनच गेली १०० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे.

भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्याची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूर राम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखलं जात.

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो.

सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल भाजलेले आहेत, हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या गाई म्हैशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या पेढ्यांमध्ये सातारच्या माणसांचा "स्वॅग" मिक्स झालाय.

या सगळ्या मुळे सातारच्या पेढ्याचा ब्रँड जगात फेमस झालाय.